आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईच्या स्थितीतही पाणी अपव्यय सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकदिवस पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी साेमवार (दि. २२)पासून हाेत असून, त्या अंतर्गत सिडकाे अाणि नाशिक पूर्व विभागाच्या काही भागातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार अाहे. अन्य भागात मात्र राेजच्याप्रमाणे १५ टक्के कपात करून पाणीपुरवठा हाेणार अाहे. एकीकडे पाणीकपातीच्या नियाेजनाची अंमलबजावणी हाेणार असताना दुसरीकडे सिडकाेत पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याचे संतापजनक चित्रही बघावयास मिळत हाेते.
गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने विभागीय अायुक्तांच्या अादेशान्वये अामदार, पालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्यासमवेत शनिवारी अायुक्त प्रवीण गेडाम यांनी केलेल्या चर्चेनंतर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात अाला. यात अाठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार अाहे. यानुसार साेमवारी सिडकाेत पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील. एक दिवस पाणीपुरवठा बंद करता दरराेज १५ टक्के पाणीकपात केली असती, तर गंगापूर धरणातील पाणी जुलैपर्यंत पुरले असते. परंतु एक दिवस पाणीकपात केल्याने अाता ३१ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध हाेऊ शकते, असे प्रशासनाने सांगितले.
महानगरपालिकेने सोमवारपासून सिडकोत पाणीकपात सुरू केली आहे. यापुढे प्रत्येक सोमवारी सिडको इंदिरानगर भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे असे नियोजन असताना सिडकोतील अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत पाण्याचा गैरवापर अपव्यय करीत आहे. या सर्व प्रकाराकडे ही प्रशासनाने लक्ष द्यावे कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडको, इंदिरानगर भागात अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर अपव्यय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या वेळी पाणीपुरवठा होतो त्या वेळी त्या भागातील संपूर्ण रस्त्यांवर पाणीच पाणी दिसते. अनेक नागरिक गच्ची धुण्यासाठी, वाहने धुण्यासाठी, सडा मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करीत असतात. काही ठिकाणी नागरिकांना पाणी मिळत नाही, काही ठिकाणी कमी दाबाने येते. असे असताना काही भागात मात्र पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करताना दिसून येतात.

जलवाहिनीला जाेडली वीज मोटार - सिडकोतील अनेक ठिकाणी नागरिकांनी जलवाहिनीलाच वीज मोटारी जोडल्या आहेत. त्यामुळे सर्व पाणी एका ठिकाणी ओढले जाऊन पुढील भागात पाणी कमी दाबाने मिळते. तर काही भागांपर्यत पाणी पोहाेचू शकत नाही. अशा वीज मोटार लावणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

घरातील नळांना तोट्याच नाहीत
सिडकोतील अनेक घरांतील नळाला पाण्याच्या तोट्या नसल्याचे चित्र आहे. पाणी भरून गेल्यावर हे नागरिक नळ तसेच चालू ठेवतात. काही नागरिक स्वच्छतागृहात पाणी सोडतात. असा प्रकार करणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अशी नागरिकांनी केली आहे.

कारवाई करू
^काही नागरिक बेजबाबदारपणे पाणी वापरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. याबाबत एक पथक माहिती घेऊन कारवाई करेल. आर आर गोसावी, पाणीपुरवठा अधिकारी.

पश्चिम नाशिक : अाकाशवाणी केंद्र, अयाेध्या काॅलनी, अरिहंत हाॅस्पिटल, एस. टी. काॅलनी उदय काॅलनी, गीतांजली साेसायटी, सहदेवनगर, चिंतामणी मंगल कार्यालय, दादाेजी काेंडदेवनगर, सुयाेजित संकुल, माणिकनगर, श्रमिक काॅलनी, कृषीनगर, डिसूझा काॅलनी, माॅडेल काॅलनी, महात्मानगर, पारिजातनगर, समर्थनगर.

नाशिकपूर्व : गीतांजलीसाेसायटी, गंगापूरराेड, जुना गंगापूर नाका, चाेपडा लाॅन्स, राठी अामराई, सिद्धार्थनगर, पर्णश्री काॅलनी, लव्हाटेनगर, पीटीसी, उत्कर्षनगर, साईनाथनगर, अमृत वर्षा काॅलनी, जेएमसीटी वडाळाराेड, विशाखा काॅलनी, जाखडीनगर, पाटील गार्डन, पेठेनगर, अण्णा भाऊ साठेनगर, महेबूबनगर, घरकुल याेजना, कलानगर, रंगरेज मळा.

सिडकोसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात आज पाणीपुरवठा होणार नाही. नवीन प्रभाग ४१ ते ४९, ५१ मधील दत्तनगर, वरचे चुंचाळे, प्रभाग ५२, प्रभाग ५३ मधील विशाखा कॉलनी, राणेनगर, चेतनानगर, किशोरनगर, रायगड उद्यान, भगतसिंगनगर, अल्को मार्केट, प्रभाग ५४ मधील पांडवनगरी, श्रद्धा विहार, शर्वरीनगरी, नाशिक केंब्रीज स्कूल परिसर, तसेच प्रभाग ६१ मधील वडनेर गेट, पिंपळगाव खांब, गणेशनगर, पोरजे वस्ती, राजपूत कॉलनी आदी भागात हा दर सोमवारी हा पाणीपुरवठा बंद राहाणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.