आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड : सभापती, नगरसेविका नागरिकांचे पवननगर जलकुंभावर अचानक आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिडको परिसरातील पवननगर, रायगड चौक, लोकमान्यनगर, भगतसिंग चौक, आदर्शनगर या भागात शुक्रवारी सकाळच्या सुमारास पाणीपुरवठा झाल्यामुळे प्रभाग सभापती कांचन पाटील, नगरसेविका शोभा निकम यांनी पवननगर जलकुंभ परिसरात आंदोलन केले. या वेळी नागरिकांसह त्यांनी स्वत: व्हॉल्व्ह फिरवून परिसरातील पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर तब्बल दाेन तासांनी आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी जाब विचारला. मात्र, उर्मट भाषेत उत्तरे देत अधिकाऱ्यांनी अरेरावी कायम ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. त्यातच शुक्रवारी बऱ्याच भागात सकाळचा पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह पवननगर येथील जलकुंभावर धाव घेतली. या वेळी तेथील कर्मचाऱ्यांना पाणी आल्याबाबत विचारणा केली असता, साहेबांनी सायंकाळच्या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल, आपल्याला त्रास होईल. त्यामुळे पाणी सोडण्यास नकार दिला आहे, असे सांगण्यात आले.
या वेळी प्रभाग सभापती कांचन पाटील, नगरसेविका शोभा निकम यांच्यासह महिलंानी जलकुंभाजवळ जमून अधिकाऱ्यांच्या उर्मटपणाचा निषेध केला. संतापलेल्या नगरसेविका, नागरिकांनी स्वत: कर्मचाऱ्यास सोबत घेत व्हॉल्व्ह खोलून पाणीपुरवठा सुरू केला. नागरिक जलकुंभ परिसरात जमलेले असतानाही एकही अधिकारी तेथे हजर नव्हता. फोन करूनही तब्बल दोन तासांनी पाणीपुरवठा अधिकारी दाखल झाले.
संतापलेल्या नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी ‘येईल ना पाणी, होईल ना पाणीपुरवठा’, अशा उर्मट भाषेत नागरिकांना उत्तरे दिली. नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यावर सकाळचा पाणीपुरवठा दुपारी वाजेनंतर सुरळीत करण्यात आला. या आंदोलनात परिसरातील विश्राम सोनवणे, अनिल सैंदाणे, अर्चना गायकवाड, रेखा मोरे, मंगल खेर, मनीषा जाधव सहभागी झाले होते.

पाण्याअभावी प्रचंड हाल
अामच्या भागात नेहमी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. मात्र, शुक्रवारी तर पाणीच आले नसल्यामुळे प्रचंड हाल झाले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही. अनिलसैंदाणे, स्थानिक रहिवासी

तांत्रिक बाबीमुळे पुरवठा नाही

गंगापूर धरणावर विजेची अडचण निर्माण झाल्यामुळे सिडको परिसरात सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही. दादाआहिरे, पाणीपुरवठा विभाग

आयुक्तांकडे जाणार
प्रभागातील पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उर्मट भाषेत उत्तरे दिली जातात. त्यामुळे याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. शोभानिकम, नगरसेविका

काहीही माहिती नाही
सिडको परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत मला काहीच माहिती नाही. कामावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याची माहिती तुम्हाला देणार नाही किंवा हजेरी पुस्तिकाही कुणाला दाखविणार नाही. पाहिजे असेल, तर साहेबांनाच विचारा. संजीवबच्छाव, पाणीपुरवठा विभाग

एक दिवस पाणी नाही आले, तर काय होणार आहे?

पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांना परिसरातील नागरिकांनी फोनवर पाणी आल्याबाबत विचारले असता, एक दिवस पाणी नाही आले तर काय फरक पडणार आहे, अशा उर्मट भाषेत त्यांनी उत्तर दिले. जलकुंभावर लोकप्रतिनिधींसमोरही त्यांनी अरेरावी कायम ठेवली. नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत असताना दखल घेता उर्मट उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जलकुंभात पाणी उपलब्ध, मात्र परिसरात पुरवठा नाही
गुरुवारीरात्री गंगापूर धरण परिसरात वीजपुरवठ्याबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पवननगर येथील पाण्याची टाकी भरलेली नसल्यामुळे सकाळचा पाणीपुरवठा हाेऊ शकला नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, दुपारच्या वेळेस जलकंुभ भरलेले असतानाही केवळ सायंकाळचा त्रास वाचावा यासाठी अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा केल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना धाव घ्यावी लागली.

सिडकाे प्रभागात शुक्रवारी सकाळी पाणी अाले नाही म्हणून सभापती, नगरसेवक नागरिकांनी पवननगर येथील जलकुंभावर पाणीपुरवठा विभागाचे संजीव बच्छाव यांना विचारणा केली असता बच्छाव यांनी सर्वांशीच असा अरेरावीने वाद घातला.
सातपूरकरांनाही करावी लागली पाण्यासाठी भटकंती

काेणतीही पूर्वसूचना देता शुक्रवारी सातपूरमधील अशाेकनगर, राज्य कर्मचारी वसाहत परिसर, नीळकंठेश्वरनगर, बळवंतनगर, अानंदछाया, श्रद्धेयनगर परिसरात पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांचे माेठ्या प्रमाणात हाल झाले.

परिसरात शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठाच झाल्यामुळे महिलावर्गाला पाण्यासाठी माेठी भटकंती करावी लागली. महापालिका प्रशासनाने पूर्वसूचना दिल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पूर्वसूचना दिल्यास पाण्याचा साठा करता येताे, असेही नागरिकांनी सांगितले. एरवीदेखील सातपूर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असताे. कामगार वसाहत माेठ्या प्रमाणात असणाऱ्या सातपूर परिसरातील पाणीप्रश्न तातडीने साेडवण्याची मागणी नागरिकांनी केली अाहे.