आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३५ लिटरपेक्षा कमी पाण्यामुळे मनसेचा पालकमंत्र्यांवर हल्लाबाेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर मुबलक पाणी देण्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने खाेटी अाकडेवारी सादर करून नाशिककरांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालवले असून, अाता १३५ लिटर प्रतिमाणसी याप्रमाणे पाणी देण्याचा दावाही पाण्यात गेल्याने मनसेने यांना पालकमंत्री म्हणणार काय, असा जळजळीत सवाल नाशिककरांना केला अाहे. मनसेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी लेखी पत्राद्वारे भाजपविराेधात हल्लाबाेल केला अाहे.

उन्हाळा जवळ येऊ लागल्याने राजकीय पटलावर पुन्हा एकदा पाणी तापण्याची चिन्हे अाहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे महापालिकेने नुकतेच साेशल अाॅडिट केले असून, त्यात बहुतांश ठिकाणी १३५ लिटर प्रतिमाणसी याप्रमाणे पाणी जात असल्याचे दिसले. वास्तविक त्यात सरासरी १८ लिटर असे प्रतिमाणसी असमान वितरण असल्याचेही समाेर अाले. दरम्यान, मध्यंतरी पालकमंत्र्यांनी १३५ लिटर प्रतिमाणसी पाणी दिल्यास ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले हाेते. प्रत्यक्षात या सरासरीने पाणी दिल्यानंतरही ४९ दिवस पाणी कमी पडणार असून, ही तूट पालकमंत्री काेठून भरून काढणार, असा सवाल अभ्यंकर यांनी केला अाहे.
पत्रकात पुढे म्हटले अाहे की, मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर सर्वच पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून शिल्लक पाणी काटकसरीने वापरण्यासाठी १५ टक्के कपात केली. अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा प्रशासनाने ४७ दिवसांसाठी पाणी कमी पडेल, असे सांगितले तेव्हा १३५ लिटर प्रतिमाणसी पाणी वापराची गरज असून, त्यानुसार ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, अशी काेलांटउडी घेतली. काेणतीही माहिती नसताना घेतलेल्या कोलांटउड्या कसरतपटूलाही लाजवतील अशाच असल्याचा टाेलाही लगावला अाहे.

सत्ताधारी-विराेधक समर्थ, लुडबूड नकाे
पालिकेत मनसेची सत्ता असून, सत्ताधारीच नव्हे तर विराेधकांनी राजकारण बाजूला ठेवून पाण्याचे नियाेजन केले हाेते. अाजही संबंधित नगरसेवक पाणी नियाेजनासाठी समर्थ असून, भाजपने लुडबूड करू नये. भाजप नेत्यांच्या चुकीमुळे नाशिककरांवर पाणीकपातीची वेळ अाली अाहे, याची अाठवण मनसेने करून दिली अाहे.

नाशिकबाबत असहिष्णू भूमिका
^मराठवाड्याला पाणी देताना नाशिककरांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत पाणीबचतीची सहिष्णुता दाखविली. त्याचा गैरफायदा घेत नाशिकचे पाणी अारक्षणच कमी करण्याचा घाट घातला जातोय. पालकमंत्री भाजप आमदारांचा बेदरकारपणा खपवून घेणार नाही. -अविनाश अभ्यंकर, संपर्कप्रमुख,मनसे