आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसातून एकवेळ पुरवठा, मात्र कालावधी दहा मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्यासाठी गंगापूर धरण समूहातून पाणी साेडल्यानंतर अाता शहरातील पाणीकपातीची धग अाणखी वाढणार असून, मंगळवार (दि. १५)पासून महापालिका क्षेत्रात ३० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला अाहे. परिणामी, दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा हाेणार असला, तरी साधारण दहा मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत पाणीकपात हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गंगापूर धरण समूहातून महापालिका क्षेत्रासाठी ३२०० दशलक्ष घनफूट पाणी अारक्षित केल्यामुळे ७२ दिवसांचे पाणी कमी झाल्याचा दावा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला हाेता. तत्पूर्वीच जुलै २०१६ पर्यंत पाणी पुरण्याच्या दृष्टीने पालिकेने अाॅक्टाेबरपासून १५ टक्के पाणीकपात सुरूही केली हाेती.

दरम्यान, गेल्या महिन्यात अाठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या महासभेत ३० टक्के पाणीकपातीची गरज महापालिका प्रशासनाने बाेलून दाखवली हाेती. त्यानुसार महासभेने अाठवड्यातून एक दिवस पाणी बंदचा निर्णय घेतला हाेता, मात्र जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्र पाठवून पुरेसे पाणी असल्यामुळे अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करू नये, असे अादेश दिले हाेते. त्यामुळे अंमलबजावणी थांबली हाेती. साेमवारी पाणीपुरवठा विभागाने परिपत्रकाद्वारे ३० टक्क्यांपर्यंत पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी अारक्षण त्यानुसार नियाेजनासाठी १२ डिसेंबरला झालेल्या बैठकीनुसार पाणीकपात वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे अधीक्षक अभियंता अार. के. पवार यांनी स्पष्ट केले.

१००एमएलडीची बचत : पाणीकपातलागू नसताना साधारणपणे शहरात ४१० एमएलडी पाणीपुरवठा केला जात हाेता. अाॅक्टाेबरला कपात लागू केल्यानंतर ३५० एमएलडी पाणीपुरवठा दरराेज केला जात हाेता. अाता पुन्हा त्यात १५ टक्के कपात लागू झाल्यानंतर १०० एमएलडी पाणीबचत हाेणार असून, दिवसाकाठी ३०० एमएलडी पाणीपुरवठा हाेईल, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपची हाेणार कोंडी
पालकमंत्री महाजन अामदार फरांदे यांनी पुरेसे पाणी असल्याचे सांगत अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यास विराेध केला हाेता. तसे पत्र पालिका अायुक्तांना पाठविल्याचा दावा झाला. त्यामुळे एक दिवस पाणी बंदचा निर्णय अमलात अाला नव्हता. अशा स्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांनी ३० टक्के पाणीकपात केल्याने नव्या वादाला ताेंड फुटण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर अाता सत्ताधारी मनसे, अपक्ष विराेधी शिवसेना भाजपला कसे घेरतात, हे बघावे लागेल.

जाब विचारणार
^जलसंपदामंत्र्यांनीपुरेसेपाणी असल्याचे सांगितले अाहे. ३५ टक्के गळती कमी करा, अशी सूचना पालिकेला केली अाहे. अशा स्थितीत कपात वाढवण्यास अाधार काय, याचा अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. देवयानी फरांदे, अामदार,भाजप

पाणीपुरवठा असा
दिवसातून एकवेळ पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार पाणी येईल. फक्त त्यात कालावधीनुसार कपात हाेईल. सिडकाे -सातपूरसारख्या भागात जर एक तास पाणी येत असेल तेथे पाच ते १५ मिनिटांपर्यंत कपात, तर जेथे दाेन तास पाणी येते तेथे अर्धा तास कपात हाेईल.
बातम्या आणखी आहेत...