आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Water Supply Problems Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हसरूळ परिसरातील पाणीपुरवठा आचारसंहितेत, निवडणुकांनंतर जलकुंभाच्या कामाला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- म्हसरूळपरिसरातील पाणीपुरवठा समस्या आणखी दीड वर्ष तरी कायम राहणार आहे. दोन जलकुंभांचे काम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने कार्यादेश होऊनही ते थांबले आहे. अनियमित पाणीपुरवठ्याने सभापतींसह नागरिकांनी दोन वेळा आंदोलनही केले आहे.
म्हसरूळ, मखमलाबाद, बोरगड, दिंडोरीरोड, पेठरोड परिसरात अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात प्रभाग १, च्या नगरसेवकांसह सभापती शालिनी पवार यांनी जलकुंभावर हंडा मोर्चा काढत आंदोलन केले होते. महापौर अशोक मुर्तडक यांनी या अंदोलनाची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले होते. मात्र, दोन वेळा आंदोलन होऊनही समस्या ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांनी कंटाळून आंदोलनाचा मार्गच सोडून दिला. कितीही आंदोलने केली तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली.
माजी नगरसेवक अरुण पवार यांनी संबंधित अधिका-याशी चर्चा केली, तेव्हा दोन्ही जलकुंभ कामांचा कार्यादेश झाला असून, आचारसंहिता असल्याने काम थांबवण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. दोन्ही जलकुंभांचे काम पूर्ण होण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याने म्हसरूळ परिसरातील नागरिकांना आणखी काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
दोनजलकुंभांचे काम रखडले :दिंडोरीरोड आणि पेठरोडवर दोन जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. दोन्ही जलकुंभांची क्षमता २० लक्ष लिटर आहे. म्हसरूळ, मखमलाबाद, दिंडोरीरोड पेठरोड परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.
.. तोपर्यंत कमी दाबानेच पाणी
दोनजलकुंभांचे काम आचारसंहितेमुळे थांबले आहे. नवीन जलकुंभ पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. अरुणपवार, माजीनगरसेवक