नाशिक - मत्सालयामुळेनाशिकच्या पर्यटनस्थळांमध्ये एका महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडणार असून, शहराचे वैभव वाढणार आहे. तसेच, या प्रकल्पातून स्थानिक युवकांना रोजगार पर्यटनाला चालना मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सातपूर टाऊन हॉल सभागृहात ‘दिव्य मराठी’ने विकास मंच अभियान आयोजित केले होते. याप्रसंगी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार उपस्थित होते. "दिव्य मराठी'चे वृत्तसंपादक प्रताप जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सातपूर भागातील स्वारबाबानगर, महादेवनगर, प्रबुद्धनगर, राजवाडा परिसर, गौतमनगर, इएसआय रुग्णालय, मळे परिसर, गावठाण या भागातील नागरिकांना रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणी अशी विकासकामे प्रस्तावित असून, ती पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देत नगरसेवक लोंढे काळे यांनी सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रबुद्धनगरमध्ये स्वच्छतेसाठी ड्रेनेजची सुविधा निर्माण करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडासंकुलात जॉगिंग ट्रक इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
स्थानिक युवकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी या भागात सुसज्ज अभ्यासिका आणि वाचनालय उभारण्याचा मानस नगरसेवकांनी बोलून दाखविला. सातपूर विभागातील राजवाडा भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील या वेळी त्यांनी दिली.
यांनीही केल्या सूचना
हर्षलकाळे, अमिन शेख, योगेश भारती, उषा साबळे, प्रभाकर शिंगाडे, रमवंती देवी कनुजिया, द्रौपदीबाई छडीदार, राजेश काळे, अशोक गांगुर्डे, अभिजित गांगुर्डे, उत्तम सोनवणे, सिद्धांत काळे, आतिष गांगुर्डे, शशिकांत काळे, राहुल काळेे, नारायण गाेडसे, सुनील पगारे, स्टीफन आढाव.
शाळेला नाव द्यावे
-सातपूर राजवाड्यातील मोकळ्या जागेवर पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शाळेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय’ असे नाव देण्यात यावे. -अविनाश भडांगे
अभ्यासिकेची नितांत गरज
-प्रभागातील युवकांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी सुसज्ज अभ्यासिका बांधण्याची गरज आहे. उच्चशिक्षित युवकांना त्याचा फायदा होईल. -महेंद्र धिवर
अतिक्रमणे तातडीने हटवा
-सातपूर भागातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. स्वागत कमानींच्या कामास चालना मिळावी. -सागर निगळ
योग्य देखभाल व्हावी
-सातपूर परिसरातील भव्य क्रीडासंकुलाची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. खेळांडूसाठी या ठिकाणी सुविधांची उभारणी करण्यात यावी. -ज्ञानेश्वर निगळ
शाळा कामाला गती द्यावी
-प्रबुद्धनगरातील पालिका शाळा क्रमांक २८च्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाली असली तरी काम सुरू नाही. या कामास लवकरात लवकर सुरुवात करून चालना द्यावी. -संतोष मनोहर