आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंचवटी: संकलेचा कन्ट्रक्शन्स आणि जानमाळी बंधू यांनी साकारलेल्या वॉटरवेज निवासी प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच झाले.
महापौर अँड. यतिन वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती. तपोवनरोडवर हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. सोहळ्यास मनसे सरचिटणीस अतुल चांडक, शरद कोशिरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, किरण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वच सुविधा या प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकर्यांनी जानमाळी यांचा, तर बिल्डरांनी संकलेचा यांचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार भुजबळ यांनी या प्रसंगी काढले. मनपाकडून अपेक्षित सहकार्य केले जाईल, असे आश्वासन महापौर यतिन वाघ यांनी दिले.
भीमाशंकर जानमाळी, दिलीप संकलेचा, तुषार संकलेचा यांनी स्वागत आणि सत्कार केला. ‘सारेगमा’फेम वादकांच्या कार्यक्रमाचे आयोजनही या प्रसंगी करण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.