आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना निष्फळ: पाण्याचा अपव्यय, पालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकवेळ पाणीपुरवठा व गळती रोखण्यासाठी महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली. मात्र, नाशिकरोडला बहुतेक ठिकाणी होणार्‍या पाण्याच्या गैरवापराकडे पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी बचतीच्या उपाययोजना निष्फळ ठरत आहेत.

नागरिकांकडून विभागात पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर होत आहे. विभागात होणार्‍या पाणी गळतीकडे पाणीपुरवठा विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या नूतन विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या आवारातील हिरवळीवर मोठय़ा प्रमाणावर पाणी टाकले जाते, तर सध्या पालिकेचे कामकाज सुरू असलेल्या इमारतीमागे दिवसाआड रात्रभर धो-धो पाणी गळती होते.

विभागात भररस्त्यावर वाहने धुणे, घरासमोर पाण्याचा सडा मारला जातो, याकडे अधिकारी, कर्मचारीवर्गाचे लक्ष नसून, तक्रार केल्यानंतर कारवाई होत नसल्याने उपाययोजना निष्फळ ठरत आहे.

24 ठिकाणी कार्यवाही
विभागात दिवसाला चार ते पाच पाणी गळतीच्या तक्रारी येतात. लॅमरोडला 600 एम.एम. पाइपलाइन व शिवाजीनगर येथील गळतीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आठवड्यात 24 ठिकाणची पाणीगळती थांबवली. नागरिकांची पाणीबचतीची जबाबदारी समजून घ्यावी.
-एन. के. पाटील, उपअभियंता, महापालिका

तक्रारीची दखल नाही
आठवड्यात दोन-तीन वेळा पाणी वाया जाऊन शेकडो लिटर पाण्याचे नुकसान झाल्याने केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.
-उन्मेष गायधनी, आर्किटेक्ट

कनेक्शन, तोट्यांची तपासणी
पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी नळकनेक्शन, तोट्यांची तपासणी मोहीम राबवली. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
-मीना हांडोरे, विभागीय अधिकारी, मनपा