आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकाेत हजाराे लिटर पाण्याचा अपव्यय, प्रशासनाचे दुर्लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडको विभागातील महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग म्हणजे नेहमीच वादाचा विषय ठरलेला असतो. गेल्या दाेन-तीन दिवसांपासून सिडकाेतील अनेक भागात पाणीपुरवठा झालेला नाही, तर काही ठिकाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत अाहे, याकडे प्रशासन कानाडाेळा करत असल्याचा अाराेप नागरिकांनी केला अाहे.

उत्तमनगरसह परिसरात दोन दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा हाेत अाहे. अनेक ठिकाणी तर नळाला पाणीच येत नसल्याची स्थिती अाहे, तर अनेक ठिकाणी कमी दाबाने अवेळी पाणीपुरवठा हाेत अाहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत माहिती घेतली असता डीजीपीनगर भागात एका व्हॉल्व्हमनने पाणी सोडले नसल्याचे समजले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट पवननगर येथील जलकुंभावर धाव घेतली, मात्र या ठिकाणी सर्व कारभार रामभरोसे असल्याचे निदर्शनास आले. संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला, मात्र नेहमीप्रमाणे उडवाउडवीचे उत्तर मिळाले. या सर्व प्रकाराबाबत सिडकोतील लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली असून, पाणीपुरवठ्याच्या कारभाराबाबत कारवाईची मागणी केली आहे.

आजाराला आमंत्रण : सिडकोतील अनेक भागात गढूळ पाणी येत असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पाण्यामुळे खोकला इतर आजार बळावण्याची शक्यता असल्याने स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांची हेळसांड
अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याचा गोंधळ सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सणासुदीच्या काळात हा प्रकार सुरू आहे. भूषणराणे, सामाजिक कार्यकर्ते

हजारो लिटर पाणी रस्त्यावर
अंबड लिंक रोडवरहजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते. सिडकाे परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासन गंभीर नाही. या भागात नेहमीच अशी पाणीगळती होऊन पाणी वाया जाते. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. -किरण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते

अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
पाणीपुरवठाअ धिकारी संजीव बच्छाव हे बेजबाबदारपणे कारभार करतात. नागरिकांना नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देतात. जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली जाते आहे. प्रशासनाने कारवाई करावी. - सुधाकर बडगुजर, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...