आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळे म्हणतात, संसदेत आम्ही साडी, फॅशन, चित्रपटांबाबत गॉसिपिंग करतो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार सुप्रिया सुऴे (फाईल फोटो) - Divya Marathi
खासदार सुप्रिया सुऴे (फाईल फोटो)
नाशिक- संसदेत गंभीर मुद्द्यांवर प्रदीर्घ आणि नीरस भाषणे होतात त्या वेळी कधीकधी एकमेकींच्या साड्यांवरही चर्चा करतो, अशी दिलखुलास गप्पा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मारल्या.

एका कार्यक्रमात सुप्रिया म्हणाल्या, ‘तुम्ही लेक्चरच्या वेळी बोअर होता. त्या वेळी तुम्ही दीपिका पदुकोण बाजीराव-मस्तानीमधील तिच्या लुक्सविषयी बोलत असाल. आम्हीही संसदेत कधीतरी असे करतो. एकसारखी भाषणे एेकून कंटाळा आला तर आम्ही इतर मुद्द्यांवर चर्चा करतो. मी संसदेत जाते. पहिले भाषण ऐकते. मग दुसऱ्या, तिसऱ्या,चौथ्या भाषणात तेच तेच मुद्दे येतात. त्यामुळे कधीकधी डुलकीही लागते किंवा शेजारच्या खासदाराशी गप्पा मारतो. तुमची साडी कुठून आणली, माझी कुठून आणली अशीही चर्चा होते. तुम्हीही अशा गप्पा मारता ना?
हलक्या फुलक्या गप्पा मारा- सुप्रियांचा कानमंत्र

संसदेमध्ये फक्त गंभीर चर्चा दिसतात. बऱ्याचदा महिला खासदार घरगुती विषयांवरच काय साड्यांवरही चर्चा करतात. गंभीर काम करताना हलक्या फुलक्या वातावरणातच करा, या शब्दांत सुप्रिया सुळेंनी कानमंत्र दिला.

दक्षिणेकडील खासदारांशी काय बोलतात सुप्रिया?...
- मुलींना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या, लांबलचक लेक्चरमुळे तुम्ही पण बोअर होऊन जाता ना? अशा वेळी तुम्ही दीपिका पादुकोण आणि बाजीराव मस्तानीमधील तिच्या लुक्सबाबत चर्चा करीत असचाल.
- संसदेत आम्ही पण असेच करतो. एखाद्या मुद्यांवरील तेच तेच मुद्दे व भाषणे ऐकून आम्हाला पण बोअर होते. त्यावेळी आम्ही इतर मुद्यांबाबत बोलत असतो.
- जेव्हा मी संसदेत जाते तेव्हा पहिले भाषण ऐकते. परत दुसरे अन् तिसरे भाषण ऐकते. नंतर मात्र बोअर होऊन जाते.
- चौथ्या भाषणापर्यंत सर्व मुद्दे रिपीट होतात मग आम्ही आमच्या गप्पा सुरु करतो. चौथ्या भाषणानंतर मला कोणता खासदार काय बोलला हे विचारला तर मला माहित नाही असे मी उत्तर देते.
- कंटाळवाण्या भाषणादरम्यान अधून-मधून छोटीशी डुलकी घेतो. नाहीतर शेजारी बसलेल्या खासदारांशी गप्पा सुरु करतो. आमच्या तेथे जे चालते तुमच्या वर्गात चालत नसेल.
- असे समजा, मी चेन्नईच्या खासदाराशी चर्चा करत असते तेव्हा तुम्हाला वाटत असेल ताई चेन्नईच्या पुराबाबत बोलत असेल पण तसे नसते. तुम्ही साडी कुठे घेतली, कितीला घेतली व मी कुठून घेतली अशी साधकबाधक गप्पा होतात. तुम्ही लोक पण अशा गप्पा मारता की नाही?
'
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पुरुष खासदारांबाबत सुप्रिया काय म्हणाल्या....