आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला माेदी काकांना भेटायचंय, ते सिलिंडर देतात ना...! अंजली-मंजली या चिमुरड्यांचा बालहट्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘अाम्हाला माेदी काकांना भेटायचंय... पेट्राेलपंपावरच्या चित्रावर अाम्ही राेज त्यांचा फाेटाे बघताे.. ते गॅस सिलिंडर देतात ना... सिलिंडर मिळाले तर अाईला त्रास हाेणार नाही.. चुलीच्या धुरामुळे तिच्या डाेळ्यातून पाणी येते हाे.. खाेकला पण खूप येताे..’ अंजली मंजली या जुळ्या बहिणी बाेलत हाेत्या. थॅलेसेमियाग्रस्त तिसरी बहीण मेघाही दाेघींच्या सुरात सूर मिसळून पंतप्रधानांशी भेट घडवून अाणण्याची इच्छा प्रकट करीत हाेती.

गॅस कनेक्शनसोबत शेगडीसाठीही सबसिडी देणाऱ्या उज्ज्वला याेजनेची हाेर्डिंग शहरात लागली अाहेत. त्यात एका बाजूला पंतप्रधान माेदी यांचे छायाचित्र, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कामगार स्त्रीचे छायाचित्र अाहे. गाेविंदनगर येथील एका इमारतीच्या बांधकाम साइटवर बिगारी काम करणारे ज्ञानेश्वर कांबळे यांचे कुटुंब उदरनिर्वाह करते. त्यांची पत्नी मनीषा धुणी-भांड्याचे काम करते. दाेघांचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम पाच हजारांच्या घरात. त्यातील बराचसा पैसा तीन मुलींवर खर्च हाेताे. यातील चाैथीत शिकणाऱ्या अंजली मंजली या जुळ्या बहिणी अाहेत, तर मेघा सहावीत अाहे.

या तिघी बहिणी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाचा पत्ता शाेधत प्रतिनिधीला भेटल्या. त्यांनी अाल्या-अाल्या ‘तुमच्या पेपरला माेदी काकांचा फाेटाे छापून येताे. तुमची त्यांच्याशी अाेळख असेल. अामची अन् त्यांची भेट घालून द्या,’ असा अाग्रह धरला. ‘तुम्हाला माेदींना का भेटायचेय’, असा प्रश्न केला असता त्यांनी अापली व्यथा मांडली. अाई राेज चुलीवर स्वयंपाक करते. चुलीच्या धुराचा तिला त्रास हाेताे. गॅस सिलिंडर घेण्यासाठी त्यांच्याकडे रेशनकार्डही नाही. माेदींची जाहिरात राणेनगर येथील पेट्राेलपंपावर त्या राेजच बघतात. त्यावर गॅस सिलिंडरचे चित्र अाहे. कुणीतरी त्यांना सांगितले की, गॅस सिलिंडर तुम्हाला माेदीच देऊ शकतात. त्यामुळे माेदींना भेटण्याची त्यांची धडपड सुरू झाली. ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झालेले माेदी यांचे छायाचित्र बघून त्या माेठ्या अाशेने कार्यालयात अाल्या. ‘दिव्य मराठी’ छायाचित्र प्रसिद्ध करू शकते म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांची माेदींशी चांगलीच घसरट असेल, अशी त्यांची बालसुलभ भावना. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी त्यांच्या घरी गेला असता अठरा विश्व दारिद्र्याची प्रचिती अाली. शिवाय, माेठी मुलगी मेघाच्या गंभीर अाजारपणामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असल्याची जाणीव झाली.

...तर पसरेल काेमेजलेल्या चेहऱ्यांवर हसू
रेशनकार्ड वा अाधारकार्ड नसलेली असंख्य कुटुंबे शहरात वास्तव्यास अाहेत. त्यांना किमानपक्षी अाधारकार्ड तरी मिळू शकते. परंतु, या याेजनेची त्यांना माहितीच नसते. सरकारी पातळीवरही संबंधित कुटुंबांपर्यंत पाेहोचण्याची तसदी घेतली जात नाही. शिवाय, विविध लाेकाेपयाेगी याेजनांची माहिती जनतेपर्यंत पाेहोचवली जात नाही. त्यामुळे अार्थिक दुर्बल घटक त्यापासून वंचितच राहतात. अंजली-मंजलीच्या बालसुलभ अाग्रहातून ही बाब प्रकर्षाने पुढे येते. सरकारी याेजना वंचित घटकांपर्यंत पाेहोचल्यास त्यातून अंजली- मंजली अाणि त्यांच्यासारख्या असंख्य बालकांच्या काेमेजलेल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुटेल.
बातम्या आणखी आहेत...