आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weapons News In Marathi, Police Raid Issue At Nashik, Divya Marathi

पोलिसांच्या छाप्यात गावठी कट्टा जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील सराईत गुन्हेगारांच्या शोधमोहिमेत गुन्हे शोध पथक क्रमांक दोनच्या कर्मचार्‍यांनी सातपूर येथील जगतापवाडी भागात छापा टाकला असता, संशयिताकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकास ताब्यात घेण्यात आले.

सातपूर, अंबडसह विविध पोलिस ठाण्यात लुटमारी, शस्त्राचा धाक दाखवून घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश भंडारी याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपआयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी दुपारी जगतापवाडी भागात छापा टाकला.

या वेळी संशयित भंडारी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, त्याचा साथीदार संजय भोलाप्रसाद राजभोज यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.