आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wearily Defamation Threats Lady Doing Suicide At Nashik

बदनामीच्या धमक्यांना कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लग्न केले नाही तर बदनामी करण्याच्या वारंवार मिळणार्‍या धमक्यांना कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या मुलीची आई रार्जशी नाठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार संशयितांवर सरकारवाडा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली प्रवीण नाठे (रा. घारपुरे घाट) या मुलीस याच परिसरातील हर्षद दत्तात्रेय वनसे याने प्रेमसंबंध प्रस्थापित करून आपल्याशी लग्न करावे यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. लग्नाचे वय नसल्याने या मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर हर्षद व त्याचे नातेवाइक अलका वनसे, संतोष वनसे, संगीता बोंबले हे सर्व जण या मुलीस धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.