आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Website Can Help To Industrialist At Nashik, Divya Marathi

‘महाएसएमई’ संकेतस्थळ ठरणार उद्योजकांना लाभदायी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात संख्येने 70 टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांकरिता ‘महाएसएमई’ हे संकेतस्थळ लाभदायी ठरणार आहे. या संकेतस्थळावर केंद्र व राज्य शासनाची उद्योगांकरिताची परिपत्रके, विविध नियम यांची सविस्तर माहिती उपलब्ध असून, उद्योजकांच्या समस्यांबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कायदेशीर मार्गदर्शनही मिळणार आहे. एकंदरीतच हे संकेतस्थळ उद्योजकांना सातत्याने अपडेट करेल.

महाउद्योग मित्र आघाडीने www.mahasme.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. नाशिकच्या उद्योजकाच्या संकल्पनेतून साकारलेले हे संकेतस्थळ विकसित केले आहे ते नाशिकचे; पण पुण्यात नोकरी करणारे आयटी इंजिनिअर्स चिन्मय गंगाखेडकर व रोहन पेशकार यांनी. जिल्ह्यातील तीन हजारांवर, तर राज्यातील लाखभर मध्यम व लघुउद्योगांना याचा फायदा होणार आहे. उद्योजकांचा संबंध ज्या विभागाशी येतो त्या सर्व विभागांशी निगडित आतापर्यंतची नवी सर्व परिपत्रके, नवनवे शासनादेश, सर्व विभागांचे नियम एकाच ठिकाणी (सिंगल विंडो) उपलब्ध आहेत.

उद्योजकांना ठरणार वरदान
अनेक चांगल्या योजनांची न मिळणारी माहिती मिळून उद्योजकांना त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे ते वरदान ठरणारे आहे. -एम. जी. कुलकर्णी, अध्यक्ष, लघुउद्योग भारती

बाइलद्वारे राहणार अपडेट
याच संकेतस्थळाचा फायदा मोबाइलवर अँप डाउनलोड करून घेता येतो. याकरिता गुगलवर sme < space>help center असे टाइप केल्यावर लोगो येतो. मोबाईलवरूनही उद्योजकांना यामुळे अपडेट राहता येते. -प्रदीप पेशकार, संकेतस्थळाचे निर्माते

याव्यतिरिक्त काय?
या संकेतस्थळावर परिपत्रके, नियमांची माहिती तर मिळेलच, याशिवाय कॅलेंडर या पर्यायावर क्लिक केल्यावर महिन्यानुसार कोणत्या तारखेला कोणता कर भरायचा आहे, याची माहितीही समोर येते. एक्झिबिशन या पर्यायाद्वारे देशभरात कोणती औद्योगिक प्रदर्शने आहेत याचीही माहिती महिन्यांनुसार समोर येते.