आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळ ठप्प अन् चाचणी अहवाल गप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने यंदापासून प्रथमच शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमध्ये फेब्रुवारीत विद्यार्थ्यांची (मानसशास्त्रीय दृष्टीने) कल चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी (दि. २५) www.ivgs.ac.in वर जाहीर झाला. आपला अहवाल जाणून घेण्याची विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरूच झाल्याने अहवाल जाणून घेता आल्याने मोठी निराशा झाली.
दहावीचे वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, असा प्रश्न मुलांना पडतो. विशिष्ट क्षेत्राकडे वाढलेला ओढा पाहून मग पालकही पाल्याची आवड लक्षात घेता करिअरची पुढील दिशा ठरवतात. मात्र, काही वर्षांनी वारंवार अपयश पदरी पडल्यानंतर मुलांमध्ये नैराश्य येते. त्यामुळे इयत्ता दहावीत विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कल जाणून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार यंदाची पहिली कल चाचणी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. त्याचा ऑनलाइन अहवाल २५ एप्रिल रोजी दुपारी वाजता जाहीर होणार होता. मात्र, संकेतस्थळ सुरूच झाल्याने विद्यार्थ्यांना कल जाणून घेता आला नाही. रात्री उशिरापर्यंतही संकेतस्थळ ठप्पच राहिले.

निकालाच्या दिवशीच कलचाचणीचा अहवाल
राज्यभरात १५ लाखांहून अधिक विद्यार्थी कलचाचणीसाठी प्रविष्ट होते. दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकेबरोबरच कलचाचणीचा अहवाल वाटप केला जाणार आहे.