आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरविलेल्या बालकांसाठी संकेतस्थळ ठरेल उपयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकाळात लहान मुले हरविण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडत असतात. या पार्श्वभूमीवर हरवलेल्या बालकांच्या शाेधासाठी जिल्हा यंत्रणेच्या वतीने स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात येत असून, ते नॅशनल मिसिंग ट्रॅकरशी जाेडले जाणार आहे.

लहान मुलांचे हरविणे ही समस्या जागतिक स्तरावर भेडसावत आहे. माेठ्या यात्रोत्सवांच्या काळात मुले हरविण्याचे प्रमाण वाढत असते. देशभरातील चारही कुंभमेळ्यात लहान बालकांचा हरविण्याचा प्रश्न आ वासून असताे. या पार्श्वभूमीवर नॅशनल मिसिंग ट्रॅकर या संकेतस्थळाचा उपयाेग हाेताे. या संकेतस्थळावर हरविलेल्या बालकांविषयीची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे सापडलेल्या बालकांचीही माहिती दिली जाते. हे संकेतस्थळ महत्त्वाच्या सर्वच िजल्ह्यांना जाेडलेले असल्याने जिल्हा प्रशासनही यातील माहितीच्या अनुषंगाने कार्यवाही करते. या ट्रॅकरच्या माध्यमातून आजवर अनेक हरविलेल्या बालकांचा शाेध लावणे शक्य झाले आहे.

सिंहस्थकाळात नाशिक शहरात देशाच्या विविध भागांतील लाखाे भाविक दाखल हाेणार आहेत. हे भाविक विशेषतः पंचवटी किंवा गाेदाघाटासारख्या परिसरात गर्दी करतात. या गर्दीत लहान मुलांचे बाेट पाल्यांच्या हातातून सुटण्याची शक्यता असते. तसे झालेच तर हरविलेली ही बालके गर्दीमुळे सापडणेही अवघड हाेऊन जाते. अशा प्रकारचा अनुभव चारही शहरांतील कुंभमेळ्यात येत असताे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपडेट करण्यात येत असलेल्या मिसिंग ट्रॅकर संकेतस्थळाचा आगामी सिंहस्थात मोठा उपयाेग हाेणार आहे.

काय असेल संकेतस्थळात
नाशिकएनआयसी सेंटरवर भरलेली माहिती http://www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळापर्यंत पोहोचवली जाईल. शिवाय, आता हरवलेल्या सापडलेल्या मुलांची ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या एनआयसी केंद्रातर्फे नाशिकच्या संकेतस्थळासाठी कामकाज सुरू आहे. बालकांशी संबंधित काम करणार्‍या ३२ संस्था, बालकांची काळजी संरक्षणाचे काम करणारी समिती, िजल्ह्यातील ५१ पाेलिस ठाणे या संकेतस्थळाशी जाेडण्यात आले आहेत. या सर्व संस्थांना माहिती भरण्यासाठी लाॅगिन आयडी देण्यात आले आहेत.