आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनपावलांनी अाल्या गाैरी, पारंपरिक आभूषणांनी मढवून माहेरवाशिणींचे स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सजवलेल्या घरांमध्ये अाधीच दाखल झालेल्या गणरायापाठाेपाठ माहेरवाशिणी मानल्या जाणाऱ्या गाैरींचेही साेनपावलांनी अागमन झाले. घराेघरी सकाळपासूनच ज्येष्ठा अाणि कनिष्ठा गाैरींच्या अागमनासाठीची लगबग दिसून येत हाेती.
ज्येष्ठा-कनिष्ठा गाैरी त्यांच्या बाळांसह माहेरपणासाठी येतात, अशी महिला भाविकांची श्रद्धा अाहे. त्यामुळे या माहेरवाशिणींना नव्या साडीचा साज चढवत नाकात नथ, हातात पाटल्या, गळ्यात माेतीहार, कंठहार, मेखला अशा विविध पारंपरिक अाभूषणांनी सजवण्यात अाले.
शहर आणि परिसरात कुठे धातूच्या मुखवट्याच्या गाैरी तर काही ठिकाणी प्लॅस्टर अाॅफ पॅरीसच्या मुखवट्याच्या गाैरींची परंपरा अाहे. भाद्रपद षष्ठीला गाैरीला अावाहन करुन तिची प्रतिष्ठापना केली जाते. त्याप्रमाणे शनिवारी ज्येष्ठा कनिष्ठा गाैरीला साग्रसंगीत वाजतगाजत अावाहन करण्यात अाले.

अाज गाैरीपूजन
पहिल्या दिवशी गाैरी येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी घराेघरी गाैरींचे पूजन अाणि त्यांना साेळा भाज्यांचा नैवैद्य दाखवून जेवायला घातले जाईल. त्यानंतर साेमवारी गाैरींना निराेप दिला जाणार अाहे. तीन दिवस माहेरी राहून माहेरवाशीण तिच्या सासरी परतते अशी त्यामागील परंपरा अाहे.