आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्डिंग अाॅक्सिजनचा अहवाल ‘नाे अाेपिनियन’ अाल्याने संभ्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रुग्णालयांना अाैद्याेगिक वापराच्या अाॅक्सिजन सिलिंंडर पुरविणाऱ्या सिन्नर येथील कारखान्यावर अन्न अाैषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून दीड लाख रुपये किमतीचे २६ अाॅक्सिजन सिलिंडर जप्त केले हाेते. सकाळी सुरू केलेली ही प्रक्रिया रात्री पर्यंत सुरू हाेती. पथकाने अाॅक्सिजनचे नमुने सील करून मुंबई येथील अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविले. मात्र, तेथील शासकीय विश्लेषकांनी स्पष्ट अहवाल देण्याएेवजी ताे ‘नाे अाेपिनियन’ असा दिल्याने या पथकात संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे, असा अहवाल बहुधा प्रथमच प्राप्त झाल्याने नाशिक विभागाचे सहअायुक्त भूषण पाटील यांनी ‘स्पष्ट’ अहवाल देण्यासाठी मुख्यालयाशी पत्रव्यवहार केला अाहे.
ब्राह्मणवाडे येथील विठाेबानगरी अाैद्याेगिक वसाहतीतील स्वस्तिक एअर प्राॅडक्ट्स या विनापरवाना गॅस उत्पादक कारखान्यावर अन्न अाैषध प्रशासनाच्या पथकाने २४ फेब्रुवारी राेजी छापा टाकला हाेता. परिश्रमपूर्वक टाकलेल्या या यशस्वी छाप्याने सर्वांच्या चेहऱ्यावर केलेल्या कामाचे समाधान झळकत हाेते. या छाप्यात जप्त केलेल्या अाॅक्सिजन सिलिंडरमधील अाॅक्सिजनचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यात मेडिकल वापरासाठी अाॅक्सिजनचे प्रमाण कमी असल्याची अाकडेवारी उल्लेखित केली असली तरी अहवाल मात्र ‘नाे अाेपिनियन’ दिल्याने या विभागाचे अधिकारी चक्रावून गेले अाहेत.

नाे अाेपिनियनमुळे असा हाेऊ शकताे परिणाम : अन्नअाैषध प्रशासनाने विनापरवाना रुग्णांच्या वापरासाठीचा अाॅक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकल्याने त्यांना हे प्रकरण न्यायालयासमाेर सादर करावे लागणार अाहे. यात या कारखान्यातून पुरविलेल्या सिलिंडरमधील अॉक्सिजन रुग्णांसाठी याेग्य नसल्याचे सिद्ध करावे लागेल. अाॅक्सिजन प्रमाणित की अप्रमाणित, याचा अहवाल देण्याचा अधिकार अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळेतील शासकीय विश्लेषकांना अाहेत. मात्र, त्यांनी ‘नाे अाेपिनियन’ असा शेरा दिल्याने या विभागाला हे न्यायालयापुढे सिद्ध करता येऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित उत्पादकावर काेणत्या अाधारावर कारवाई केली, याचे उत्तर द्यावे लागणार असल्याने सहअायुक्तांनी तत्काळ मुख्यालयाशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला.

फेर तपासणीचे पत्र
^‘नाे अाेपिनियन’अहवाल का दिला अाहे, याची शासकीय विश्लेषकांकडे चाैकशी करण्यात येणार अाहे. नाशिकच्या सहअायुक्तांनीही फेरतपासणी करण्याचे पत्र दिले अाहे, त्यावर अाम्ही विचार करू. मात्र, मी दहा दिवस सुटीवर असल्याने तुम्ही दहा दिवसांनंतर चाैकशी करा. - राकेश तिरपुडे, सहायकसंचालक, अाैषध नियंत्रण प्रयाेगशाळा, मुंबई