आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Welingkar Institute Of Management Associate Dean Of Pvt. Victor Manika Guidance To Businessman

क्षमतांमुळेच प्रसंगी येते अपयश, प्रा. सपना मल्यांचे उद्योजकांना मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तुमच्या ज्या क्षमता तुम्हाला यशस्वी बनवितात, त्याच तुमच्या अपयशाचे कारण बनतात. त्यामुळे यश मिळाले म्हणून अति हुरळून जाता आणि त्याच्या आनंदोत्सवात रमता भविष्याकरिता कामाला लागणे गरजेचे असते. उद्योग-व्यवसाय कोणताही असो. पण, उद्योजकाला एक यश मिळाले तर दुसऱ्या व्यावसायिक संकटासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. व्यवसायातील चढ-उतार हीच उद्योगातील जिवंतपणाची लक्षणे असून, सातत्याने नावीन्याचा ध्यास ठेवून व्यवसाय सुरू ठेवला पाहिजे, अशा टिप्स वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (वी स्कूल)चे असोसिएट डीन प्रा. व्हिक्टर मनिकम यांनी उद्योजकांना दिल्या.

वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल गेट-वे येथे मंगळवारी झालेल्या ‘उद्योजकतेला प्रोत्साहन’ विषयावरील कार्यशाळेत प्रा. मनिकम प्रा. सपना मल्या यांनी मार्गदर्शन केले. या वेळी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, युवा उद्योजक समितीच्या चेअरपर्सन नेहा खरे, आयमाच्या उपाध्यक्षा नीलिमा पाटील आदी उपस्थित होते.
संपत्ती निर्माणात तुम्ही फक्त स्वत:चा विचार करतात. मात्र उद्योजकाला त्याच्यासह त्याच्याकडील कामगार, व्हेंडर, पुरवठादार, वितरक यांचाही विचार करावा लागतो. यातूनच आर्थिक समृध्दी पसरते. जे शक्य नाही ते शक्य करणे हे उद्योजकासाठी गर्वाचे काम असते, असे स्पष्ट करतानाच समृध्दी, परिपुर्णता आणि गर्व या तीन मुलभुतबाबी उद्योजकतेत असतात असेही मनिकम यांनी स्पष्ट केले.
या टीप्सही उद्योजकांसाठी ठरल्या महत्वाच्या
- पैसा वाचवून उद्योग उभारता येत नाही तर त्याकरीता पैसा खर्च करावा लागतो.
- नावीन्य आणि संशोधन उद्योजकाची सवय असली पाहिजे.
- तुमच्या उद्योगात चुकीचे काय घडते याकडे तुमच्यापेक्षा तुमच्या स्पर्धकांचे अधिक लक्ष असते, हे विसरू नका.
- ज्या-ज्या कारणाने तुम्ही यशस्वी झाला त्याच कारणाने तुम्ही अपयशीही होऊ शकता.
- तुमचे विचार हीच एक उद्याेजकता असून, तुमच्या कल्पनांबाबत अधिकाधिक लोकांशी चर्चा करा.
- तुमचे उत्पादन हे ग्राहकाच्या कुटुंबाच्या भावनांशी निगडित आहे, याचा विचार नेहमी मनात ठेवा.
सभागृह फुल्ल, आज ‘निमा’त कार्यशाळा
हॉटेल गेट-वेचा बॉलरूम पहिल्या दुसऱ्या पिढीतील तरुण उद्योजकांनी अक्षरशः गच्च भरला होता. अनेकांना जागेअभावी परतही जावे लागले. यामुळे वी स्कूलची हीच कार्यशाळा बुधवार, १० जून रोजी दुपारी २.३० वाजता निमा हाऊस, आयटीआय सिग्नलजवळ येथे होणार आहे.