आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया पथकाने तीन वर्षांत दीड हजार महिलांना दिला अाधार, नाशिकमध्‍ये सुसज्ज निर्भया पथक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवऱ्याने मारले, सासूने मध्यरात्री घराबाहेर काढून दिले, शेजाऱ्यांकडून शिवीगाळ, रिक्षाचालकाकडून असभ्य वर्तन, रात्रीच्या वेळी बसस्थानकातून बाहेर पडताना टवाळखाेरांकडून छेड काढण्याचा प्रयत्न हाेणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या तक्रारी प्राप्त हाेताच ‘निर्भया’द्वारे तत्काळ घटनास्थळ गाठून पीडितांना अाधार दिला जाताे. याच पथकाकडून गत तीन वर्षांत अशा स्वरूपाच्या जवळपास दीड हजार महिला, मुलींना मदत मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. 
 
दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भयाकांडच्या घटनेनंतर तातडीने जानेवारी २०१३ मध्ये तत्कालीन पाेलिसअायुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी नाशकातील महिला, विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निर्भया पथक कार्यान्वित केले. पहिल्याच महिन्यात पथकाकडे ५० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. त्या पथकाने त्या क्षणाचाही विलंब करता साेडविल्याने महिला वर्गाचा विशेषत: विद्यार्थींनीचा विश्वास बसून तक्रारींचा अाेघ वाढत गेला. 

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींना टवाळखाेरांकडून हाेणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी बघता पथकाने घटनास्थळी दाखल हाेत टवाळखाेरांना चाेप दिल्याने पथकाच्या कामाची सर्वत्र चर्चा हाेऊ लागली हाेती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या तक्रारींचे स्वरूप पूर्णत: बदलले असून दरराेज २४ तासात किमान १० ते १२ तक्रारी घरगुती वादाच्या येत अाहेत. महिला छेडछाडीच्या प्रकरणात घट झाली असून महिन्यातून दाेन-तीन तक्रारीच प्राप्त अाहेत. 
 
विवाहीतेस मारहाणीच्या तक्रारी अधिक : निर्भयापथकाकडे गेल्या तीन वर्षात हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या अाहेत. यामध्ये किमान दीड ते दाेन हजार तक्रारी या सासू-पतीकडून महिलांना हाेणाऱ्या मारहाणीच्या छळाच्या अाहेत. बहूतांशी तक्रारी मध्यरात्रीच्या सुमारास येत असल्याने पथक लागलीच घटनास्थळी दाखल हाेऊन पिडीत महिलेला बळ देते. संबधित पती सासूला कायद्याचा धाक दाखवित समज दिल्याने त्यांचा संसार सुरळीत झाला. 
 
दिल्लीतून अालेल्या काॅलला प्रतिसाद : महिलाहेल्पलाईनवर गेल्या महिन्यात दिल्ली येथून एका महिलेचा काॅल अाला हाेता. गंगापूरराेडवरील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या उद्याेगपतीच्या घरात पतीकडून पत्नीस मारहाण हाेऊन मध्यरात्री घराबाहेर काढून दिले जात हाेते. त्यावेळी या महिलेने अापल्या दिल्लीस्थित बहिणीस हा प्रकार कळविताच तीने इंटरनेटवरून नाशिकच्या हेल्पलाईन क्रमांक शाेधून त्यावर तक्रार केली. हेल्पलाइन कक्षातील कर्मचारी श्रीमती उगले इतरांनी ही बाब तत्काळ निर्भयाला कळविले. 

निर्भया पथकाने घटनास्थळी दाखल हाेत पती-पत्नीची समजूत काढून दाेघांमध्ये मध्यस्थीचा भूमिका बजावली. त्यामुळे दाेघांमधील तणाव कमी हेाऊन त्यांचा सुखी संसार सुरू अाहे. त्यांनतर या महिलेने पाेलिस अायुक्तांसह उपअायुक्तांना भेटून हेल्पलाईन निर्भया पथकाच्या प्रतिसादाबद्दल नाशिक पाेलिसांचे काैतुक केले. तसेच प्रत्यक्ष भेटून महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. अातापर्यंत शंभराहून अधिक महिलांनी प्रत्यक्ष येऊन या उपक्रमाचे स्वागत केले अाहे. 
 
रस्ता चुकलेल्यांनाही दाखविला मार्ग 
पथकाकडे दरराेज येणाऱ्या तक्रारीत निम्याहून अधिक तक्रारी रात्री १० ते पहाटेच्या सुमारास प्राप्त हाेतात. त्यात नवीन बसस्थानक, महामार्ग बसस्थानक अाणि रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या महिला प्रवाशांना बस, रिक्षा उपलब्ध हाेत नसल्याच्या असतात. तर काही महिलांना रिक्षाचालकांकडून अरेरावीच्या असतात. अशा वेळी पथकाकडे तक्रार येताच लागलीच महिलांना त्यांना त्यांच्या घरी सुरक्षितस्थळी साेडून देण्याचेही काम केले जाते - जयश्री सराेदे, उपनिरीक्षक 
 
नाशिक पाेलिस अायुक्तालयाचे सुसज्ज निर्भया पथक 
असुरक्षित महिला, मुलींना तक्रारी करण्यासाठी ०२५३-२३०५२३३,२३०५२३४ अाणि २३०५२४१ तसेच हेल्पलाइन क्रमांक ९७६२१००१००, ९७६२२००२००, १००, २०० या क्रमांकांवर संपर्क साधावा. तक्रार प्राप्त हाेताच येथील महिला कर्मचारी तत्काळ समाेरच्या महिलेचा पत्ता इतर माहिती घेऊन निर्भया व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना कळवितात. तिथून पुढील कार्यवाही केली जाते. दिवसभरात किमान १०० ते १२५ किलाेमीटर अंतर हे पथक संपूर्ण अायुक्तालयात कापत असतात. 
बातम्या आणखी आहेत...