आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाश्चात्य संस्कृतीचा पगडा हिंदू धर्मीयांसाठी घातक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर; पाश्चात्यसंस्कृतीचा पगडा हिंदू धर्मीयांसाठी घातक आहे. त्यामुळे सनातन धर्म त्यास अनुकूल स्वदेशीचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे केले. त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रस्ता चौफुलीवर गुरू शरणानंदांच्या कार्ष्णि शिबिरात संत संमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचा शुभारंभ श्री शंभू पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर महंत अवधेशानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी रामदेवबाबा म्हणाले, सनातन वैदिक धर्मात संन्यास दीक्षा आहे. त्यानुरुप यातील संन्यस्त ब्रह्मचारी राहतात. इतर धर्मात धर्मगुरू गृहस्थी असतात, याचेही आकर्षण पूर्ण विश्वात आणि परधर्मीयात निश्चित आहे. ते वेगवेगळ्या क्लृप्त्या करून फसवेगिरी करत आहे.

प्रखरानंद यांनी आपण प्रत्यक्ष भगवानरूप होऊ शकत नाही, तर त्याचे सर्व कार्य करू शकतो. परंतु भक्तिमार्गातही विविध विषयांतर होत असल्याने आचार-विचारात अनिष्टता शिरून मानवाने आपल्या हातानेच जीवन दु:खी करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निरंजनी पीठाधिश्वर महामंडलेश्वर पुण्यानंद यांनी तीर्थ हे ऋषी-मुनींच्या पायाशीच असतात. गीतेत याबद्दल सर्व उपदेश अाहे, असे स्पष्ट केले. जगद‌्गुरू वासुदेवाचार्य यांनी धर्म-धारणा त्यासाठीची तत्त्वप्रणाली टिकविण्यासाठीची अाजची एकता याबाबत अापले विचार मांडले. निरंजनीचे महामंडलेश्वर बालकानंद गिरी यांनी गृह-तारे निसर्गचक्र मनुष्यावर परिणाम करतात, असे सांगितले.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांनी हिंदू धर्मीयांची घटती संख्या चिंतनीय असून, त्यांना दाेन-तीन अपत्ये असावीत अन्यथा नाते विसरली जातील पाश्चात्य संस्कार पध्दती रुजली जाऊन हिंदू-सनातन धर्मावर अरिष्ट येते की काय? असे वाटू लागले अाहे, असे सांगितले.
या वेळी महामंडलेश्वर निरंजनी पीठाधिश्वर श्री पुण्यनंदगिरी, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी, गुरू शरणानंद, ज्ञानानंद, स्वरूपानंद, महामंडलेश्वर बालकानंद, जगदगुरू वासुदेवाचार्य, इंद्रदेव यांच्यासह आखाड्यांचे साधू-संत भक्त उपस्थित होते.

योगातून सुधारावे शरीरस्वास्थ्य
साधू-संतमहात्मे यांची ओळख भगवी वेशभूषा वाढविलेल्या दाढी मिशा नसून त्यांनी षड‌्रिपूंवर विजय मिळवून समाजाच्या शिक्षण संस्कारासाठी आपले जीवन समर्पित केलेले असते. आज सगळीकडे जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू तत्त्व यांची फसवणूक होते. ती थांबविण्यासाठी आपण स्वदेशीचा वापर करावा योगातून भाेगवृत्ती सोडून शरीरस्वास्थ्य सुधारावे, असे अावाहन रामदेवबाबा यांनी केले.