आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौर्‍याचे ‘राज’; प्रयोजनही खास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 8 जानेवारीपासून चार दिवसांच्या शहर दौर्‍यावर येणार असून, या प्रयोजनाचे ‘राज’ कायम असले तरी राष्ट्रवादी, शिवसेना, आप यांच्या तुलनेत आतापर्यंत शांत असलेली मनसेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होण्याचे संकेत यातून मिळाले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत नाशिकमध्ये मोठय़ा राजकीय घडामोडी घडल्या. ‘आप’ने स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेसाठी समीर भुजबळ यांनाच पुन्हा संधी देण्याचे संकेत दिले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन लोकसभा रणनीतीवर चर्चा केली. सत्ताधारी मनसेत मात्र सामसूम असल्याचे चित्र होते.
राज ठाकरे यांनी निवडक पदाधिकार्‍यांना मंगळवारी सायंकाळी 8 ते 11 दरम्यान नाशिक दौर्‍यावर येणार असल्याचे सांगितले. मात्र, दौर्‍यातील कार्यक्रम-बैठकांचा तपशील जाहीर झालेला नाही.