आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनक्रिप्शन फिचरमुळे व्हाॅट‌्सअॅप झाले धाेकेदायक; गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फेसबुकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूक प्रकरणांत गुन्हेगारांपर्यंत पाेहचणे जिकिरीचे असले तरी अशक्य नसते. मात्र ‘अॅड-टू-अॅड एनक्रिप्शन’ या फिचरमुळे व्हाॅट‌्सअॅपच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यांपर्यंत पाेहाेचणे पाेलिसांनी अतिशय जिकिरीचे हाेत अाहे. दाेन व्यक्तींमध्ये झालेला संवाद या फिचरमुळे पाेलिसी यंत्रणांना पाहणे शक्य हाेत नाही. त्यातून गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे सायबरतज्ज्ञ सांगतात.

वापरकर्त्यांच्या खासगी बाबतीत काेणी ढवळाढवळ करू नये, त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोपनीयता अबाधित राहावी, त्याचा आदर व्हावा, याकरिता यासाठी व्हाॅट‌्सअॅप कंपनीने ‘अॅड-टू-अॅड एनक्रिप्शन’ हे फिचर विकसित केले अाहे. यामुळे व्हॉट‌्सअॅपवर होणारा संवाद आता पूर्णपणे सुरक्षित झाल्याचा दावा कंपनीने केला अाहे.
 
संदेश पाठविणारी ताे रीसिव्ह करणारी व्यक्तीच हा संदेश पाहू शकते. व्हाॅट‌्सअॅप कंपनीलाही हा संवाद पाहता येत नाही. या नवीन फीचरमुळे यापुढे व्हाॅट्सअॅपचा डेटा कोणीही हॅक करू शकणार नाही. या आधी व्हॉट‌्सअॅपवर दोन व्यक्तींमध्ये पाठविले जाणारे संदेश सहज हॅक करता येऊ शकत होते. अमेरिकेतील मोबाईल कंपनी अॅपल आणि पोलिस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशीर लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु या फीचरमुळे दहशतवाद्यांचे चांगलेच फावत असून एकमेकांना संवाद साधणे अाता साेपे हाेत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला अाहे. एकीकडे वापरकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरत असले तरी दुसरीकडे मात्र याच फीचरमुळे सायबर गुन्हेगारांचे फावत अाहे. कारण, पूर्वी एखाद्या तपासात जर तपास यंत्रणांना संदेश तपासायचे असतील, तर सहज शक्य हाेत हाेते. परंतु, आता मात्र प्रत्यक्षात संबंधित माेबाईल समाेर असल्याशिवाय तपास पुढे सरकूच शकत नाही. 

सॉफ्टवेअर कंपन्यांकडून माहिती पुरविण्यास टाळाटाळ 
परदेशातील सर्व्हर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांकडून माहिती पुरविण्यास टाळाटाळ होत असल्याने या गुन्ह्यांची उकल कशी करायची, असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. त्यामुळे इंटरनेट कॉलिंगमार्फत होणाऱ्या गुन्ह्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. 
 
व्हिडिअाे काॅलिंगद्वारे त्रास वाढला 
एनक्रिप्शनफिचरमुळे वैयक्तिक चॅट, ग्रुप चॅट, व्हिडिअाे अाणि व्हाइस मेसेजचीही माहिती मिळणे दुरापास्त हाेते. त्याचा फायदा उचलत व्हिडिअाे काॅलिंगद्वारे महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढले अाहे. इंटरनेटवरील अनेक सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून फोन करण्यात येतात. त्यांचा माग काढणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असते, त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. हे आरोपी कधीही बड्या कंपन्यांच्या सेवेचा वापर करत नाहीत. परदेशस्थ कंपन्यांचे सॉफ्टवेअर वापरण्यात येत असल्याने त्यांच्याकडून कॉलरची माहिती मिळवण्याचे आव्हानच असते. या कंपन्याही पोलिसांनी मागितलेली माहिती, प्रश्न यांना तत्काळ प्रतिसादही देत नसल्याने तपासावर परिणाम होतो. 

तक्रारींसाठी करा संपर्क 
सायबरक्राइमशी संबंधित काेणाच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी ९७६२१००१०० या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गाेपनीय ठेवले जाते. 
बातम्या आणखी आहेत...