आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Whatsapp Buoyant Market On The Occasion Of Vijayadashmi

‘व्हॉटस अँप’ने उतरवला ‘एसएमएस’चा भाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘सोने उधळण्याचे दिवस आता राहिले नाहीत. परंतु, सोन्यासारखी माणसे आमच्यासोबत आहेत हे आमचे भाग्य..’ अशा शुभेच्छा संदेशांनी पूर्वी मोबाइलचे इनबॉक्स फुल्ल होत असत. मात्र, ‘व्हॉटस अँप’ने मोबाइलमध्ये प्रवेश केल्यानंतर हेच संदेश चित्र व चित्रफितीद्वारे देता येत असल्यामुळे मोबाइलवरील ‘एसएमएस’चा भाव यंदा भलताच कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइलच्या तुलनेत यंदा सर्वत्र ‘व्हॉटस अँप’वर मोठय़ा संख्येने संदेश पाठविल्याचे अनेकांनी सांगितले. पूर्वी दसर्‍यासारख्या सणाला शेकडो संदेश इनबॉक्समध्ये पडायचे. मात्र, गेल्या वर्षापासून ‘व्हॉटस अँप’ने मोबाइल संदेशांची बाजारपेठ काबीज करीत मोबाईल वापरणार्‍यांना आपल्याकडे आकर्षित केले.

नि:शुल्क सेवेमुळे चलती
मोबाइलच्या नियमित ‘एसएमएस’ला पैसे मोजावे लागतात. शिवाय सणाच्या काळात ‘एसएमएस’ची किंमतदेखील वाढविली जाते. मात्र ,‘व्हॉटस अँप’वर नि:शुल्क संदेश देता येत असल्यामुळे आम्ही त्याचाच वापर करतो. मोनाली जाधव, विद्यार्थिनी, आरवायके.