आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीस पेटवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार ओढा येथे बुधवारी उघडकीस आला. या घटनेत भाजलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीस अटक करण्यात आली आहे.

ओढय़ातील हमालवाडी परिसरातील अरुणा शिवाजी वाघ (वय 35) या महिलेचा पती मद्यपी असल्याने दोघांमध्ये नेहमी भांडणे होत. मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अरुणा स्वयंपाक करत असताना पतीने दारूसाठी पैसे मागितले. ते देण्यास नकार देताच तिला पतीने बेदम मारहाण केली व रॉकेल ओतून पेटवून दिले. पतीने पेटवून दिल्याचा तिने जबाब दिल्याने पोलिसांनी शिवाजी वाघ यास अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.