आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा कापून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर राेडवरीलआनंदवल्ली परिसरात बँकेतील महिला कर्मचाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा कात्रीने गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित संजय रघुनाथ वाघ (३४, रा. शिवाजीनगर) हा पत्नी वैशाली (२७) सोबत राहतो. उभयतांमध्ये नेहमी वाद होत असत. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संजय हा पत्नीला नेहमी मारहाण करत. सोमवारी मध्यरात्री दोघांमध्ये वाद झाले. संतापाच्या भरात पतीने कात्रीने पत्नीच्या गळ्यावर पोटावर वार करून गंभीर जखमी केले. काही नागरिकांनी गंभीर जखमी वैशालीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी रात्रीच संशयित संजय वाघ यास अटक केली.

सिंहस्थानिमित्त सर्वत्र पोलिस बंदोबस्त असूनही खुनाचे प्रकार घडत अाहेत. नागरिक पोलिसांत सुसंवाद कमी होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किरकोळ कारणावरून खून होण्याचे प्रकार घडत असल्याने हे गुन्हेदेखील पोलिसांनी गांभीर्याने हाताळणे गरजेचे बनले आहे.