आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चारित्र्याच्या संशयावरून पतीने दुसर्‍या पत्नीच्या डोक्यात दगड घालून शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
व्यवसायाने ट्रकचालक असलेला चंद्रकांत उर्फ नारायण पांडू शिंदे (45, रा. ठाणगाव, हल्ली मु. दौंडवाडी, पेठरोड) हा दुसरी पत्नी शैलासोबत राहत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये शनिवारी कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात कैलासने घरातील वरवंटा पत्नीच्या डोक्यात घातला. यावर न थांबता डोक्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेमध्ये तिला शेजारील नागरिकांसह नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयितास काही तासांत अटक केली आहे.