आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममध्येही वायफाय सेवा उपलब्‍ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएल ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असून, याचाच एक भाग म्हणून साधुग्रामध्ये वायफाय सेवा अखेर उपलब्ध करून देण्यात अाली अाहे. बीएसएनएलने शहरात वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार नाशिकसह त्र्यंबकेश्वरात ही सेवा सुरू झाली आहे.
नाशिकमध्ये पंचवटी टेलिफोन एक्स्चेंज, रामकुंड, साधुग्राम लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात वायफाय सेवा देण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला हाेता. त्यानुसार साधुग्राम लक्ष्मीनारायण मंदिर परिसर वगळता अन्यत्र ही सुविधा १५ दिवसांपूर्वीच उपलब्ध झाली हाेती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे साधुग्राम लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील सेवा सुरू हाेऊ शकली नव्हती. या परिसरात अाता वायफाय उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना पहिले ३० मिनिटे माेफत वायफाय सुविधेचा लाभ घेता येणार अाहे.

टाॅप अपद्वारेवायफायचा लाभ : बीएसएनएलनेनाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी वायफाय सेवा कार्यान्वित केली अाहे. त्याचा लाभ घेण्यासाठी टाॅपअपचा फंडा वापरण्यात अाला अाहे. टाॅपअप अथवा स्क्रॅचकार्ड खरेदीनंतर त्या माध्यमातून ग्राहकांना अखंड वायफाय सेवेचा लाभ घेता येणार अाहे. त्यासाठी ग्राहकाला स्क्रॅचकार्डवरील नंबर डायल करावा लागेल.