आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wikipedia Blackout Leads Students To Library ‎

नेटसर्फर्सची झाली मोठी अडचण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अमेरिकेच्या पायरसी प्रतिबंधक विधेयकाच्या निषेधार्थ विकिपीडियाने बुधवारी 24 तासासाठी इंग्रजी वेबसाइट बंद ठेवली होती. त्यामुळे अनेक नेटिझन्सना या माहितीच्या मोठ्या सोर्सला मुकावे लागले.
अमेरिकन प्रतिनिधी सभागृहासमोर मांडण्यात आलेले पायरसी प्रतिबंधक विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असून, ते रचनात्मक नाही, असा आरोप करत त्याच्या निषेधासाठी विकिपीडियाने बुधवारी चोवीस तास वेबसाइटचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सकाळपासून विकिपीडियावर ब्लॅक आऊट होता आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : पायरसी विधेयक’ अशा आशयाचा मजकूर स्क्रीनवर उमटत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून सगळ्याच नेटिझन्सना माहिती शोधण्यामध्ये अडथळे येत होते.
एखादा चित्रपट असो वा एखादे पुस्तक, एखाद्या देशाची वा प्रसिद्ध व्यक्तीची माहिती असो विकिपीडिया हा यासाठी सर्वात सर्वाधिक विश्वासार्ह स्रोत मानला जातो. त्यामुळे अनेकजण या वेबसाइटचा आधार घेत असतात. अनेक विद्यार्थ्यांना आपाल्या प्रोजेक्टसाठी या वेबसाईटचा उपयोग करणे सोयीचे जाते. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींनादेखील त्यांच्या कामाशी संबंधित इत्थंभूत माहिती कमीत कमी वेळात देऊ शकणारी ही वेबसाइट बंद असल्याने अनेकांना दिवसभर चुकचुकल्यासारखे झाले.
माहिती घेण्यात अडचण - मला चित्रपटांची माहिती मिळविण्याची अत्यंत आवड आहे. तसेच कॉलेजच्या प्रोजेक्टससाठीदेखील विकिपीडियावर माहिती सर्च करीत असते. इंटरनेटवर तोच एक विश्वासार्ह पर्याय आहे. त्यामुळे ही वेबसाइट बंद राहिल्याने मला रोजची माहिती शोधण्याकरता अडचण आली. - दीपाली देवरे, विद्यार्थिर्नी, इंजिनिअरिंग
सगळी माहिती मिळते - प्रॅक्टिकल्सची थेअरी ब-याचदा विकिपीडियावर अवलंबून असते. कुठलेही संबंधित नाव सर्च बॉक्सवर टाका, झटक्यात सगळी माहिती उपलब्ध होते. पण ही वेबसाईट 24 तास बंद ठेवल्याने माहिती मिळविण्यास खूप अडचणी आल्या. - मयुरी भगत, विद्यार्थिर्नी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग