आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांसाठी २६ जून राेजी विकिपीडिया परिषद, ब्रॅण्ड नाशिकसाठी सहभागी हाेण्याचे अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभथाॅन,इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्स, नाशिक महापालिका अाणि विकिपीडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २६) शहरात विकिपीडिया परिषदेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. जगभरात नाशिकविषयीची सर्वंकष माहिती पाेहाेचावी, याकरिता ही परिषद महत्त्वाची ठरणार अाहे. परिषदेला विकिपीडियाच्या स्मृती गुप्ता, अाॅस्ट्रेलियाच्या डेटा सायन्टिस्ट रितू डेव्हिड, अभिषेक सूर्यवंशी अादींची विशेष उपस्थिती राहाणार अाहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सुरू असताना शहरातील अायटीयन्सकडून ‘कुंभथाॅन’हा उपक्रम राबविला हाेता. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दीड वर्षापूर्वी विकी क्लब नाशिकची स्थापना झाली विकिपीडियावर नाशिकची सर्वंकष माहिती संकलित करून संपादित करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती विकिपीडिया कम्युनिटीच्या संताेषी तिवारी अाणि इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्सचे सुमीत खिंवसरा यांनी दिली.

या दीड वर्षाच्या काळात नाशिकबद्दलची वेगवेगळ्या २३ क्षेत्रांतील माहिती अपडेट करण्यात अाली, तर पाच हजार फाेटाे संकलित करून प्रत्यक्षरीत्या निवडक दीड हजार छायाचित्रे विकिपिडियाच्या नाशिक पेजवर टाकण्यात अाली अाहेत. अाता ‘ब्रॅण्ड नाशिक’ जगाच्या कानाकाेपऱ्यात पाेहाेचावा, असे उद्दिष्ट विकी क्लबकडून ठेवण्यात अाले असून, त्याकरिता या विशेष परिषदेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सध्या विकी क्लबद्वारे ९५ टक्के पुरुष, तर टक्के महिला माहिती संपादित करीत असून, जास्तीत जास्त नाशिककरांनी वेगवेगळ्या विषयांची माहिती विकिपिडियावर संपादित करावी, हा त्यामागील उद्देश अाहे. याकरिता २० ग्रुपमध्ये जनजागृती शिबिरेही घेण्यात अाली असल्याचे संताेेषी तिवारी यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे स्थळ
उंटवाडीतील इन्स्टिट्यूट अाॅफ इंजिनिअर्सच्या अशाेक हाॅल येथे ही परिषद २६ जून राेजी सकाळी १० वाजता सुरू हाेईल.

यांना सहभागी हाेण्याचे अावाहन
या समिटकरिता सर्वांसाठी खुला प्रवेश असून, कुठलेच शुल्क अाकारले जाणार नाही. मात्र, २२ जूनपर्यंत https://goo.gl/wQ9bcu या संकेस्थळावर अर्जाद्वारे अाॅनलाइन नाेंदणी करता येणार अाहे. त्यातून निवड झालेल्यांना या समिटकरिता प्रवेश दिला जाणार अाहे. डाॅक्टर्स, इंजिनिअर्स, अार्किटेक्ट्स, मीडियातील लाेक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्याेजक यांनी या परिषदेत सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...