आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकीपीडियाची कॉन्फरन्स पुढील वर्षी नाशकात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माहिती महाजालाचे भांडार म्हणून जगविख्यात असलेल्या आणि घडामाेडींइतक्याच वेगाने अद्ययावत होणाऱ्या विकीपीडियाची कॉन्फरन्स पुढील वर्षी नाशिकमध्ये हाेण्याची शक्यता आहे. अमेरिका दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची तेथील विकीपीडिया अॅम्बेसेडरशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी दिली.
विकीपीडियातील ज्ञान भांडारात भर घालण्याच्या उद्देशाने तसेच देशभरातील पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी विकीपीडियाची कॉन्फरन्स प्रत्येक देशातील एका शहरात आयोजित करण्यात येते. पुढील वर्षी होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी नाशिकसह अनेक महानगरांतून प्रस्ताव विकीपीडिया व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आले आहेत. अद्यापही ही प्रक्रिया सुरू असली तरी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट ‘बिड’ नाशिकचेच असल्याने आम्ही नाशिकचा प्राधान्यक्रमाने विचार करीत असल्याचे विकीपीडियाचे अॅम्बेसेडर अभिषेक सूर्यवंशी यांनी बोस्टन भेटीत नाशिक मनपाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी या कॉन्फरन्ससाठी प्रशासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकचे नाव या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणार असल्याने ती देण्याची तयारी असल्याचे उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी सांगितले. देशभरातील विकीपीडिया कम्युनिटीचे किमान ५०० सदस्य दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. त्यात विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. वेगवेगळ्या विषयांसाठी संबंधित पॅनलची निश्चिती तसेच भविष्यात विकीपीडिया - विकीमीडियाच्या प्रसाराचे नियोजन केले जाते. यावर्षी ही परिषद अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये झाली होती.

विकीपीडियातील ज्ञान भांडारात भर घालण्याच्या उद्देशाने तसेच देशभरातील पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी विकीपीडियाची कॉन्फरन्स प्रत्येक देशातील एका शहरात आयोजित करण्यात येते. पुढील वर्षी होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी नाशिकसह अनेक महानगरांतून प्रस्ताव विकीपीडिया व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आले आहेत. अद्यापही ही प्रक्रिया सुरू असली तरी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट ‘बिड’ नाशिकचेच असल्याने आम्ही नाशिकचा प्राधान्यक्रमाने विचार करीत असल्याचे विकीपीडियाचे अॅम्बेसेडर अभिषेक सूर्यवंशी यांनी बोस्टन भेटीत नाशिक मनपाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यांनी या कॉन्फरन्ससाठी प्रशासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नाशिकचे नाव या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणार असल्याने ती देण्याची तयारी असल्याचे उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी सांगितले. देशभरातील विकीपीडिया कम्युनिटीचे किमान ५०० सदस्य दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. त्यात विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. वेगवेगळ्या विषयांसाठी संबंधित पॅनलची निश्चिती तसेच भविष्यात विकीपीडिया - विकीमीडियाच्या प्रसाराचे नियोजन केले जाते. यावर्षी ही परिषद अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये झाली.

संबंधित पॅनलची होते निश्चिती
देशभरातील विकीपीडिया कम्युनिटीचे किमान ५०० सदस्य दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतात. त्यात विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. वेगवेगळ्या विषयांसाठी संबंधित पॅनलची निश्चिती तसेच भविष्यात विकीपीडिया - विकीमीडियाच्या प्रसाराचे नियोजन केले जाते. यावर्षी ही परिषद अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये झाली होती.

ऑगस्टचा प्रस्ताव
‘विकी कॉन्फरन्स इंडिया-२०१६’ या परिषदेचे आयोजन ऑगस्ट महिन्यात करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने सर्व मदत मिळावी, अशी अपेक्षादेखील सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. यानिमित्ताने शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार असल्याने ती मदत देण्याचे आश्वासन दिल्याचे बग्गा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...