आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेवेसींचे भाषण सरकार तपासणार, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैरंगाबाद महापालिकेत जाेरदार मुसंडी मारत ‘एमअायएम’ पक्षाने २५ जागा पटकावल्या अाहेत. मात्र या निवडणुकीत अाेवेसी बंधूंनी भावना भडकावणारी भाषणे केल्याचा अाराेप हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी आणि अकबरोद्दीन ओवेसी या दोन्ही बंधूंच्या भाषणांची तपासणी करणार असल्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये सांगितले.

कुठल्याही धर्माधिष्ठित, जातीयवादी पक्षाला मिळालेले यश हे समाजासाठी कायमच धाेकादायक असते. त्यानुसार अैारंगाबादमध्ये एमआयएमला मिळालेले यशही धोकेदायकच आहे. ओवेसी बंधू दोन समाजात तेढ निर्माण करण्याचेच काम करत अाहेत, असा अाराेप वायकर यांनी केला. ओवेसी बंधूंनी मनपा निवडणुकीत नेमकी काय भाषणे केली. मतदारांना नेमके कसे भुरळ घातले, कुठल्या मुद्द्यावर राजकारण केलं याची तपासणी करणे राज्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानुसार अाेवेसींच्या भाषणाची तपासणी करावी, अशी सूचना सरकारला करणार असल्याचे ते म्हणाले.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हजारो भाषणे केली. परंतु दोन समाजात तेढ निर्माण होईल असे त्यांनी कधीही केले नाही. उद्धव ठाकरेही आक्रमक असले तरी ते एकसंघ समाजासाठीच प्रयत्न करत असतात. मात्र ओवेसी बंधूंमार्फत जे तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे त्याला शिवसेनाच आवर घालणार असल्याचेही वायकर यांनी सांगितले.
अैारंगाबाद नव्हे, संभाजीनगर
अैारंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर करावे असा ठराव विधिमंडळात मीच मांडला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत या शहराचे नाव संभाजीनगर हाेईल, असा विश्वास वायकर यांनी व्यक्त केला. शिवाय अाैरंगाबादच्या विमानतळालाही संभाजी महाराजांचेच नाव देण्यासाठीही मी पुढाकार घेतला असून शिवशाहीचे सरकार असल्याने ते करणारच असल्याचे त्यांनी सांगितले.