आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी गाेदेच्या पुराच्या पातळीचे करणार अाता रेखांकन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पूररेषा निश्चितीची अत्यंत किचकट खर्चिक बाब, त्यातही निकषाबाबतचा गाेंधळ लक्षात घेत बांधकाम परवानगी साेडा, मात्र किमान गाेदाकाठी पुरामुळे हाेणारा विध्वंस टाळण्यासाठी महापाैर अशाेक मुर्तडक यांनी महापुरामुळे जेथपर्यंत पाणी अाले तेथे रेखांकन करून ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. त्याची सांगड गंगापूर धरणातून साेडल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गाशी घातली जाणार असून, त्यामुळे भविष्यात इतके पाणी साेडले तर इथपर्यंत पाणी येऊ शकते हे लक्षात येईल तेथील रहिवाशांना अागाऊ सूचना देत त्यांचे स्थलांतर करणे शक्य हाेईल.
गाेदावरीला अाॅगस्टला अालेल्या महापुरामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली. २००८ पेक्षाही अधिक भीषण स्थिती असल्याचे चित्र हाेते. गाेदावरीवरील अहिल्याबाई हाेळकर पूल साेडला तर बाकी बहुतांश पूल पाण्यात हाेते. या पुराचे पाणी मल्हारखाण, जाेशीवाडा, रामवाडी, गंगावाडी, रामकुंड, सरदार चाैक, सराफ बाजार अशा भागांमध्ये घुसले. असाच प्रकार नासर्डी, वाघाडी या उपनद्यांच्या काठावरही झाला. या पार्श्वभूमीवर किमान गाेदावरीचा पूर हा गंगापूर धरणातून साेडलेल्या पाण्याशी बहुतांश संबंधित असल्यामुळे किमान धरणातून इतके पाणी साेडल्यावर इतक्या पातळीपर्यंत पाणी येऊ शकते याचे ढाेबळ निदान करणे शक्य अाहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी धरणातील पाण्याचा विसर्ग ज्या ज्या वेळेत झाला त्यानुसार गाेदावरी किनाऱ्यावर पाणीपातळी कशी कशी वाढली, तसेच सर्वात्तम पाण्याचा विसर्ग सुरू असताना कुठपर्यंत पाणी अाले याचेही रेखांकन करून ठेवण्याच्या सूचना महापाैरांनी अतिरिक्त अायुक्त अनिल चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीप्रसंगी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. जेणेकरून भविष्यात विसर्गनिहाय पाणी जेथपर्यंत पाेहाेचू शकेल अशा ठिकाणी असलेल्या रहिवाशांना अागाऊ स्थलांतरीत करता येईल त्याबराेबरच त्यांच्या महत्त्वाच्या वस्तूही हलवण्यासाठी अवधी मिळेल.

उद्याेजकासहस्वयंसेवकाच्या मदतीने अापत्कालीन पथक : महापालिकेनेउद्याेजकांसह स्वयंसेवकांच्या मदतीने संभाव्य अापत्तीचा सामना करण्यासाठी खास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी महापाैर अशाेक मुर्तडक यांनी बड्या कंपन्यांना पत्रही पाठवले अाहे. महापुरासारख्या अापत्तीत तसेच पुनर्वसनाच्या कार्यात महापालिकेची अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येमुळे दमछाक झाली हाेती. तसेच यंत्रसामुग्री केवळ कर्मचाऱ्यांअभावी वापरता अाली नव्हती. या पार्श्वभूमीवर माेठ्या कंपन्यांकडील संभाव्य अापत्कालीन टिमही महापालिकेसाठी गरज पडेल तेव्हा देण्याचे अावाहन केले अाहे. याबराेबरच हाेमगार्ड, सुरक्षारक्षक मंडळ, महाविद्यालय तसेच शाळांमधील एनसीसी तसेच अापत्कालीन व्यवस्थेसाठी सक्षमपणे काम करू शकेल अशा प्रत्येकाला सहभागी करून घेतले जाणार अाहे. त्यासाठी महापाैरांनी शनिवारी दुपारी हाेमगार्डसह काही एनसीसी स्काॅडशी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे, अापत्कालीन काम करणाऱ्यांचा विमाही काढला जाणार असून, जेणेकरून काेणतीही दुर्घटना घडल्यास त्यांना याेग्य ती मदत मिळू शकेल.

साेपा उपाय, परंतु दीर्घकालीन फायदा
^महापुरामुळे हाेणाऱ्या नुकसानीवर वेळेत प्रतिबंधात्मक उपाययाेजना हाच महत्त्वाचा पर्याय अाहे. त्यामुळे विसर्गनिहाय पाणी कुठपर्यंत अाले याच्या खुणा भविष्यात फायदेशीर ठरतील. तशा सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात अाल्या असून, भविष्यात उदाहरणार्थ १५ हजार क्यूसेक पाणी साेडले तर चिंचबनापर्यंत येईल याची माहिती असल्यास तेथील लाेकांना अाधीच स्थलांतरित करून नुकसान जीवितहानी टाळता येईल. -अशाेक मुर्तडक, महापाैर
बातम्या आणखी आहेत...