आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांचे फाेटाे असलेल्या रुग्णवाहिकेत मद्यसाठा, सायरन वाजवत निघालेला वाहनचालक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकीय नेत्यांचे फाेटाे लावलेल्या या रुग्णवाहिकेतून पाेलिस उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अवैध मद्यसाठा जप्त करण्यात अाला. - Divya Marathi
राजकीय नेत्यांचे फाेटाे लावलेल्या या रुग्णवाहिकेतून पाेलिस उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अवैध मद्यसाठा जप्त करण्यात अाला.
नाशिक - राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यात निर्मित अडीच लाख रुपयांचा मद्यसाठा एका रुग्णवाहिकेतून जप्त केला. शुक्रवारी (दि. १७) सकाळी ६.३० वाजता गोविंदनगर, इंदिरानगर बोगदा येथे ही कारवाई करण्यात आली. रुग्णवाहिकेवर सर्व पक्षांच्या नेत्यांचे फोटो असल्याने हा मद्यसाठा नेमका कुठल्या पक्षासाठी आणण्यात आला होता, याचा शोध सुरू आहे. पथकाने चालकास अटक केली. 
 
उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागाचे पथक मध्यरात्री गस्त घालत असताना पहाटे गोविंदनगर येथून रुग्णवाहिकेचा (एमएच १५ इएफ ७२२) चालक सायरन वाजवत जात असल्याने पथकाने रुग्णवाहिकेस रस्ता दिला. रुग्णवाहिकेचा वेग इंदिरानगर बोगदा येथे कमी झाल्याने रुग्णवाहिकेत चालकाशिवाय कोणी नसल्याचे दिसल्याने पथकाने रुग्णवाहिका थांबवली झडती घेतली.
 
रुग्णवाहिकेतून अवैध मद्यसाठा जप्त 
असतास्ट्रेचरच्या खाली पांढऱ्या रंगाच्या २६ बॉक्समध्ये दादर-नगर हवेली येथे निर्मित मद्य अाढळून आले. राज्यात या मद्यसाठ्याची किंमत सुमारे अडीच लाखांची अाहे. रुग्णवाहिका चालक अमिताभ मधुकर शार्दुल याच्या विरोधात महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयुक्त प्रदास सुर्वे, रवींद्र आवळे, एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आर. आर. धनवटे, वाय. आर. सावरखेडकर, जवान सुनील टिपरे, कैलास कसबे, दीपक आव्हाड, अमित गांगुर्डे, गणेश शेवगे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. 
 
अवैधमद्याची माहिती द्या 
- रुग्ण वाहिकेतून अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. रुग्णवाहिका चालकास अटक करण्यात आली आहे. रुग्णवाहिका मालकाचा शोध सुरू आहे. शहर जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यसाठा विक्री होत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. तत्काळ कारवाई करू.
-प्रसादसुर्वे, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक
 
पुढील स्लाइडवर वाचा, रुग्णवाहिकेबाबत संभ्रम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...