आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुलाने तयार केलेल्या ब्रँडीला जागतिक स्पर्धेत कांस्यपदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - द्राक्षांचे अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर दरात घसरण होत असल्याने बहुतांश उत्पादकांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नुकसान नको म्हणून, वाइन उद्योगांच्या माध्यमातून वाइन ग्रेप्सचा पर्याय पुढे आणला. सुला विनियार्डने यापुढे जाऊन वाइनमधील अल्कोहोलपासून जॅनस ही ब्रँडी तयार केली. या जॅनस ही ब्रँडीला इंटरनॅशनल स्पिरीट चॅलेज या स्पर्धेत सुला विनियार्डला कांस्यपदक प्राप्त झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव पुन्हा उज्ज्वल झाले अाहे. या ब्रँडीमुळे वाइन ग्रेप्स उत्पादकांना पुन्हा सुगीचे दिवस प्राप्त होणार आहेत.
गेल्या महिन्यात लंडन येथे इंटरनॅशनल स्पिरीट चॅलेज ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ७० देशांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पेयांचे उत्कृष्ट वितरण, पॅकिग आणि चव या तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. नाशिकच्या सुला विनियार्डने वाइनमधील अल्कोहोलपासून तयार केलेल्या जॅनस ब्रँडीच्या चवीसाठी कांस्यपदक मिळवले आहे. ब्रँडीला मागणी वाढली तर अप्रत्यक्ष वाइन ग्रेप्सच्या मागणीत वाढ होणार असल्याने नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसाठी लाभदायी ठरणार आहे.

इंडियनब्रँडी चविष्ट : यावर्षी१७०० पेये स्पर्धेसाठी आली होती. त्यामुळे परीक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. कोणत्या पेयाला पुरस्कार बहाल करायचा. यात इंडियाची ब्रँडी चवीत उत्कृष्ट ठरल्याचे आयोजक जस्टीन स्मिथ म्हणाले.
जॅनस म्हणजे काय
रोमनदेवांमधील दोन तोंडे असलेल्या जॅनस या देवाच्या नावावरून या पेयाचे नाव ठेवण्यात आले आहे. जॅनसमध्ये फ्रान्सची सर्वोत्कृष्ट कॉनियॅक बनविण्याची पद्धत आणि सुला विनियार्डमध्ये तयार केलेल्या पेयासाठी सर्वोत्कृष्ट निवडण्यात आलेली द्राक्षे हे फ्रान्सच्या अलेम्बिक पॉट स्टिल्स वापरून डिस्टिलेशन करून तयार केलेले पेय म्हणजे जॅनस होय.
अपेक्षा आणखी वाढल्या
^ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुला विनियार्डने जिंकल्याने केवळ सुलाचेच नाही, तर देशाचे नाव उंचावले आहे. ही जॅनस पूर्णपणे द्राक्षापासून तयार केली असल्याने ब्रँडीबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. जागतिक पातळीवरील हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आमच्या मेहनतीला फळमिळाले आहे. - राजीव सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुला विनियार्ड
लंडन येथे इंटरनॅशनल स्पिरीट चॅलंेज स्पर्धेत सुला विनियार्डला कांस्यपदक मिळाले.
बातम्या आणखी आहेत...