आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरेकडील थंड वा-यामुळे नाशिक शहरात बोचरी थंडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उत्तरेकडून थंड वा-याचा प्रतितास वेग बारा किलोमीटर असल्याने शहरात दिवसभर बोचरी थंडी जाणवत होती. बुधवारपासून उत्तरेकडून येणा-या थंड वा-याचा वेग हा नेहमीपेक्षा वाढला होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तपमान किमान 8.2, तर कमाल 23.5 डिग्री सेल्सिअस होते. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान 7.5, तर कमाल 24 डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात बोच-या थंडीने नागरिकांना गारठावले. शहरात तर कामावर जाणारे कर्मचारी उबदार कपडे घालूनच बाहेर पडले होते. तसेच सकाळी वातावरण ढगाळ असल्याने साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश नसल्याने गारवा नेहमीपेक्षा जास्तच जाणवत होता. सकाळी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत होती.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तपमानात घसरण झाली होती. त्यावेळी थंडी मोठ्या प्रमाणात पडली होती. त्यानंतर कालपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ झाली आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने पहाटे दव मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यामुळे जमिनीत गारवा निर्माण होत असल्याने थंडीमध्ये वाढ होते. तसेच आज ग्रामीण भागासह शहरातही धुके दिसत होते.
उत्तरेकडील वा-याने गारवा - दोन ते तीन दिवसांपासून उत्तर भारतातून थंडीचे वारे वाहण्याचा वेग हा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. - डी. एस. माटे, हवामान केंद्र, नाशिक