आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये राज्यातील सर्वात कमी तपमान;11.6 अंशांची नोंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे तपमानात किंचित वाढ झाली होती. मात्र, रविवारी आकाश पुन्हा निरभ्र झाल्याने तपमानात घसरण होऊन थंडीमध्ये वाढ झाली. रविवारी (दि. 29) राज्यात सर्वात कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. हे तपमान किमान 11.6 अंश सेल्सिअस होते.

ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडील वाहणार्‍या वार्‍यांमुळे वातावरणात गारवा जाणवत असला तरी तपमानात वाढ झालेली होती. शनिवारी 14 अंश सेल्सिअस असलेले तपमान रविवारी साडेतीन अंशांनी कमी झाले. त्यामुळे रविवारी सकाळी अचानक थंडीत वाढ झाली होती.