आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Help Of Friend Husband Murdered Wife In Nashik

नाशिकमध्‍ये मित्राबरोबर लुटीचा बहाणा रचून केला पत्नीचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सततच्या वादाला कंटाळून मित्राच्या मदतीने पत्नीचा खून केल्याची घटना नाशिक जिल्हय़ातील शिरवाडे-वाकद शिवारातील सातमोरी भागात रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सुरुवातीला चार दरोडेखोरांनी ऐवज लुटत मारहाण केली व नंतर मला बांधून ठेवत पत्नीवर बलात्कार करून त्यांनी तिचा खून केल्याचा बनाव या महिलेचा पती भारत धोकट्र यानेच केला होता. मात्र, तपासात भारतनेच हा कट रचून मित्राच्या मदतीने खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
कोळगावमाळ (ता. सिन्नर) येथील भारत हा पत्नी शीतलसह दुचाकीवरून रावळगाव (जि. जळगाव) येथून रविवारी रात्री परतत होता. ‘चौघांनी अडवून मारहाण करत मला बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले व पंधरा हजारांचा ऐवज लुटून त्यांनी पत्नीवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला,’ अशी फिर्याद भारतने दिली होती. घटनेनंतर भारतने वडिलांना मोबाइलवरून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. लासलगावचे पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. तपासात पोलिसांना अनेक घटना खटकत होत्या. सततच्या वादामुळे शीतल सुरत येथे माहेरी गेली होती. समझोत्यानंतर भारत तिला परत घेऊन आला होता. मात्र, वाद सुरूच राहिल्याने भारतने तिचा काटा काढण्यासाठी कट रचून गुलाब निवृत्ती ठाकर (रा. कोळगावमाळ) या मित्राच्या मदतीने तिचा खून केला. नंतर गुलाबकडून स्वत:च्या शरीरावर वार करून घेत दरोडेखोरांनी जखमी केल्याचा भारतने देखावा केला. मात्र, हात बांधलेले असतानाही भारतने वडिलांना फोन कसा केला, यावरून पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला व त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
मालेगावात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार
मित्राच्या पाचवर्षीय मुलीस फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करणार्‍या ताहेज मोसिन शेख या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. हा घृणास्पद प्रकार शहरातील रमजानपुरा भागात घडला. संशयित आरोपीस सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.