आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीमध्ये ४८ तासांत पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून साेडण्यात अालेले पाणी. छाया: अशोक गवळी
नाशिक/इगतपुरी - न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, दारणा धरण समूहातून ८००० क्यूसेक, गंगापूरमधून जवळपास ११०० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. सायंकाळी वाजेपर्यंत टीएमसी पाण्याचा विसर्गही झाला असून, हे सर्व पाणी ४८ तासांतच जायकवाडीस पोहोचण्याचा अंदाज आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने १७ ऑक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाच्या मुद्यानुसार नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मराठवाड्यास पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश कायम ठेवले. त्यानुसार शासनाने पाणी सोडले आहे. सोमवारी सायंकाळी वाजेपर्यंत गंगापूरमधून ११०० क्यूसेकने जवळपास ३०० दलघफू आणि दारणातून ८००० क्यूसेकने ६५० द.ल.घ.फू. असे दोन्ही मिळून जवळपास टीएमसी पाण्याच्या दोन्ही समूहातून विसर्ग झाला आहे.

सोमवारी पाण्याचा वेग वाढविण्यात आला होता. त्यात दारणा धरणातून ४००० क्यूसेक, मुकणेतून १००० आणि कडवा धरणातून ३००० क्यूसेकने असे ८००० क्यूसेकने प्रवाह सोडला जात आहे, तर गंगापूर धरणातून ११०० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात एकत्र होत तेथून पुढे गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याद्वारे जायकवाडीस मिळेल. यातील पाण्याचा अपव्यय बघता, दारणा समूहातून नांदूरमध्यमेश्वरपर्यंत ६००० क्यूसेक प्रवाह कायम असेल, तर गंगापूरचा प्रवाह ७०० क्यूसेक असेल. नांदूरमध्यमेश्वरमधून हे पाणी ६५०० क्यूसेकने प्रवाही राहील. तसेच, सध्या दारणातून शिर्डी, कोपरगाव आणि राहात्याला आवर्तन सुरू असल्याने खालील के. टी. वेअर्स जवळपास भरलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा हा प्रवाह जवळपास तेवढाच राहील. त्यात फारसा अपव्यय होणार नाही. ७० टक्के पाणी जायकवाडी धरणात पोहोचेल.म्हणजेच नाशिकच्या ४.६ टीएमसीपैकी ३.२० टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

वीजपुरवठा राहील खंडित
पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून नदीकाठालगतचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी धरणांमधून सोडलेल्या पाणीसाठ्यापैकी फक्त ६० टक्केच पाण्याचा लाभ होणार असून, उर्वरित पाण्याचे विविध कारणास्तव नुकसान होणार असल्याचे तहसीलदार गणेश राठोड यांनी सांगितले.

दारणा धरणातून पाणी सोडणे बंद करावे : आमदार वाजे
मुंबई उच्च न्यायालयाने जरी पाणी सोडण्याचे केवळ आदेश दिले असले, तरी प्रत्यक्ष किती पाणी सोडावे, हे न्यायालयाने म्हटलेले नसल्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत प्रशासनाने पाणी बंद करावे, अशी मागणी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दारणा धरणावर केली. तर, या पाण्याच्या विरोधात मंगळवारी सकाळी घोटी-सिन्नर महामार्गावरील साकूर फाट्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धरणग्रस्तांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी सोमवारच्या बैठकीत केले. दारणा धरणावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. रविवारी मध्यरात्री दारणा धरणातून ४००० हजार क्यूसेक, मुकणे धरणातून हजार क्यूसेक, तर कडवा धरणातून हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...