आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांनी सहा दिवसांतच केली लाखोंची कमाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून अवघ्या सहा दिवसांत लाखो रुपयांची कमाई केली. कैद्यांनी सागवानी लाकडापासून बनवलेल्या वस्तूंच्या किंमती बाजारभावापेक्षा जास्त असताना कारागृहातील वस्तूंना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीची धूम आहे.भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा चायनीज् वस्तूंचाच बोलबाला असताना या स्पर्धेत मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी खासगी बाजारपेठेवर मात केली आहे. दिवाळीनिमित्त मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात आयोजित दिवाळी मेळ्यात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रास ठेवल्या आहे. 24 ऑक्टोबरला मेळावा सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत तयार वस्तू होतोहात विकल्या गेल्या. या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र त्यांना त्या मिळेनाशा झाल्या आहेत. यावर कारागृह प्रशासनातर्फे ग्राहकांची मागणी नोंदवून त्यांना वस्तू तयार करून दिल्या जात आहेत. इतर वस्तूंबरोबर चंदन, गुलाब, मोगरा, सुंगधी उटणे, अंगांचा व कपडे धुण्याच्या साबणाला मोठी मागणी आहे.
या वस्तूंची झाली विक्री
महिलांसाठी जरदोसी वर्क व टिकलीकाम केलेल्या साड्या, सेमी पैठणी, टॉवेल, सतरंजी, देवाचे आसन, भिंतीवरील होल्डर, टेबल-खुर्ची, सागवान लाकडाचे देव्हारे, साबण, उटणे, पणत्या, चंदन, गुलाब, मोगरा, सुंगधी उटणे, लेदर वस्तू, कॉटन जीन्स, नेहरू शर्ट-पायजमा, उशी कव्हर, कॉटन बर्म्युडा, बेकरी उत्पादने, लक्ष्मी स्टॅँड, सागाचा पाट, चौरंग, पोळपाट या वस्तूंची मोठी विक्री झाली.
सागवान वस्तूंना ग्राहकांकडून अधिक मागणी
कैद्यांच्या विविध कलाकृतींना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सहा दिवसांत एक लाख रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मागणी अधिक असल्याने वस्तूंची हातोहात विक्री होत आहे. अविनाश गावित, तुरुंग अधिकारी (कारखाना व्यवस्थापक)