आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअप कर लिया, ताे क्या...जाणून घ्‍या विशीतील तरुणी आणि चाळिशीतील आयांची मते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जब दिल ही टूट गया... अब जी कर क्या करे... येथपासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास सध्या ‘आज मैने ब्रेक अप कर लिया...’ या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बदलत्या काळानुसार नात्यातील बदलांचे हे पदर. ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ असे सांगत मनाविरोधातील सक्तीने नाते टिकविण्याचा आटापिटा मागे पडतो आहे.
 
एखाद्याशी किंवा एखादीशी मैत्रीत जवळीक झाली म्हणजे आपले प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणून लग्न करायचे आणि लग्न केले म्हणून ते पटत नसतानाही शेवटपर्यंत निभावण्यासाठीचा आटापिटा हा काळ मागे पडतोय. पॅचअपपेक्षा ब्रेकअपचीच चर्चा अधिक हाेतेय. फक्त चर्चाच नाही तर सेलिब्रेशनही! काय म्हणायचे या बदलाला? व्यवहारिक विचार की उथळपणा? काय वाटते याबाबत विशीतील तरुणींना आणि चाळिशीतील त्यांच्या आयांना? या इन्संट ब्रेकअपची काय अाहेत काैटुंबिक कारणे अाणि सामाजिक परिणाम? प्रेमानंतरचे ब्रेकअप आणि लग्नानंतरचे घटस्फोट यांचे प्रमाण सध्या का वाढताना दिसतेय? महिला दिनाच्या निमित्ताने वाढत्या ब्रेकअप आणि घटस्फोटांबद्दल नाशिकमधील काहीजणींची ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतलेली ही मते...

का होताहेत ब्रेकअप?
{ मुलींमध्ये स्वजाणिवेची कमतरता 
{ अति किंवा फाजील आत्मविश्वास
{ नात्यांकडे उथळपणे बघण्याचा घातक दृष्टिकोन
{ मुलांच्या पारंपरिक अपेक्षा
{ करिअर अन‌् कामाचे बदलते स्वरूप
{ पुरुषप्रधान मानसिकता
{ मुलींचा भावनिक कमकुवतपणा
{ पालकांची दुभंगलेली नाती
{ कुटुंबातील विसंवाद
{ नात्यांमधील बांधिलकी, जबाबदारीचा अभाव
{ नवीन पिढीतीलबदलती मूल्ये
{ सोशल मीडियाचा अतिरेक
 
ब्रेकअप झाले तर काय कराल..?
{ आधी स्वत:ला काय हवे ते नक्की ठरवा...
{ आयुष्यात काय करायचे हे पहिल्यांदा निश्चित करा
{ स्वत:साठी वेळ घ्या, काेणत्याही निर्णयाची घाई करू नका
{ भावनिक उद्रेकात टोकाचा निर्णय अजिबात घेऊ नका
{ दु:खाला कवटाळू नका. चिंतन करा, विचार करा
{ ब्रेकअपने अजिबातच कोलमडून पडू नका किंवा त्याचे इतरांसमाेर प्रदर्शनदेखील करू नका
{ ब्रेकअपमधून काय शिकलात ते शोधून काढा
{ स्वत:मध्ये काय सुधारणा करायच्या त्याचा विचार करा
{ निर्णयाबाबत जवळच्यांशी नेहमी मोकळेपणाने बोला...
 
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, ब्रेकअप आणि घटस्फोटांबद्दल तरुणी आणि महिलांची मते... 
बातम्या आणखी आहेत...