आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला पाेलिस ठाण्यात, कमोदनगरमध्ये वाढत्या घटनांनी संताप अनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरानगर - कमोदनगरमध्ये विकृत दुचाकीस्वाराकडून छेडछाडीचे प्रकार नेहमीचेच झाल्याने मुली महिलांनी रात्री ९.३० वाजता इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून टवाळखाेरांना वठणीवर अाणण्याची मागणी केली. 
 
साेमवारी (दि. १८) रात्री वाजेच्या सुमारास असाच प्रकार घडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिले असता दुचाकीस्वार भरधाव असल्याचे दिसले. एकच दुचाकीस्वार सर्व ठिकाणी आढळून अाला. सातत्याने घडत असलेल्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली. पाेलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले अाहे की, कमोदनगरात गेल्या पंधरा दिवसांत महिलांना लक्ष्य करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन महिलांसह शाळेतील मुलींचा पाठलाग करत अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीवर मारून पळून जाण्याचा प्रकार घडला. सिटी प्राईड इमारत, हॅपी होम कॉलनी तसेच गजरा पार्कजवळही असेच प्रकार झाले आहेत. मंगळसूत्र चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. 
 
पोलिसांचा वचक कमी झाल्याने टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून महिलांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. टवाळखोरांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने महिला, विद्यार्थिनींसह नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाऊन उपनिरीक्षक जगदीश गावित यांना निवेदन देत टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी गौरी आहेर, शुभांगी जोशी, रत्ना नारखेडे, सविता कदम, संगीता पिंगळे, देवयानी मदाने, विजया बागड, सुभाष नारखेडे, सचिन चव्हाण, सोमनाथ सोनवणे, अजय निफाडे अादी उपस्थित हाेते. 
बातम्या आणखी आहेत...