आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला रुग्णालय वाद: मुख्यमंत्र्यांच्या अादेशाचाही केला अक्षरश: ‘फुटबाॅल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिलांच्या शंभर खाटांच्या रुग्णालयावरून भाजप अामदार देवयानी फरांदे विरुद्ध प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते त्यांचे पुत्र उपमहापाैर प्रथमेश गिते यांच्यातील वादात भाजपची पुरती नाचक्की झाली असताना विराेधी पक्षाने त्यास पुरेपूर तडका दिल्यानंतर अाता खुद्द भाजपचेच नगरसेवक फाेडणी देताना दिसत अाहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महिला रुग्णालयाबराेबरच दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या अावाराची जागा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अादेशाचा अक्षरश: फुटबाॅल केला जात असल्याचे चित्र अाहे.
 
गिते समर्थक मानले जाणारे भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे रुग्णालय पेलिकन पार्क येथील जागेत करावे, अशी मागणी अायुक्तांकडे केली अाहे. तिकडे मनसे गटनेते सलीम शेख यांनी सातपूरला चुंचाळे शिवारात पाच एकर जागेवर रुग्णालय करण्याची मागणी केली अाहे. गेल्या दाेन महिन्यांपासून महिलांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय चर्चेत अाहे. प्रारंभी संदर्भ रुग्णालय, वडाळा अाराेग्य केंद्राच्या जागेनंतर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत महिला रुग्णालय करण्याचे ठरले, मात्र त्यास उपमहापाैर गिते यांच्यासह भाजप नगरसेवकांनी विराेध करीत रुग्णालयाचे टाकळी येथे स्थलांतर करण्याची मागणी केली. तसा ठरावही गुपचूप झाला. त्यानंतर मात्र फरांदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत भाजपमधील गटबाजीबाबत कैफियत मांडली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निराेप देत मुख्यमंत्र्यांनी फरांदे यांना काैल देत गायकवाड सभागृहाच्या जागेतच रुग्णालय उभारणीचा निर्णय दिला. त्यानुसार महाजन यांनी महापाैरांना अादेश देत ठरावही करून घेतला. हा ठराव शासनाकडे गेल्यानंतर धक्का बसलेल्या गिते गटाने उघड संघर्ष सुरू केला. त्यास भाभानगर येथील नागरिकांनी जाेड देत रुग्णालयाला स्थलांतरित करण्याची मागणी केली. दरम्यान, या वादात राष्ट्रवादी, अापसह सेनेने उडी घेत तडका दिला. मात्र, अाता नगरसेवकही या वादात उतरल्याचे चित्र असून शहाणे यांनी अायुक्तांकडे रुग्णालयासाठी पेलिकन पार्कची जागा उपयुक्त असल्याची मागणी केली.
 
सातपूरला रुग्णालय नेण्यास सलीम शेख अाग्रही
भाजपनगरसेवकाने सिडकाेत महिला रुग्णालय स्थलांतरित करण्याची मागणी केली असताना, मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी कामगार गोरगरिबांची वस्ती असलेल्या सातपूर विभागात या महिला रुग्णालयाची उभारणी करणे अधिक उपयुक्त ठरेल, असा पवित्रा घेतला अाहे. त्यांनी महापालिका अायुक्तांना याबाबत पत्र देत महिला रुग्णालय सातपूरला हलवण्याची मागणी केली अाहे. सातपूर विभागात गोरगरीब, कामगार वस्ती अधिक असून १०० खाटांच्या या महिला रुग्णालयाची खरी गरज सातपूरवासीयांसाठी असल्याचे शेख यांचे म्हणणे अाहे. रुग्णालयासाठी चुंचाळे शिवारातील पाच एकर आरक्षित जागादेखील उपलब्ध असून सातपूरला महिला रुग्णालय झाले तर भाजपतील वाद मिटेल. शिवाय मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा सन्मान राहील, असाही चिमटा घेतला अाहे.
 
वाद कसा चिघळेल याकडे विराेधकांचे लक्ष
रुग्णालयगायकवाड सभागृहाच्या जागेतच व्हावे, या मुख्यमंत्र्यांच्या अादेशाचा भाजपकडूनच फुटबाॅल केला जात असल्यामुळे विराेधक सध्या गंमत बघण्याबराेबरच वाद कसा चिघळेल यावर लक्ष केंद्रित करीत अाहेत. दुसरीकडे अामदार फरांदे यांनी पक्षशिस्तीला काेण कसे पायदळी तुडवते, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला नगरसेवक पदाधिकारी कसे धाब्यावर बसवतात, हे शांतपणे बघण्याची भूमिका घेतली अाहे. राेजच्या घडामाेडी जाहीर विराेधाच्या घटना पक्षश्रेष्ठींना कळवल्या जात असून, तेथून याेग्य ताे निर्णय हाेईल, असा अंदाज बांधून तूर्तास फरांदे गट माैन बाळगून अाहे.
बातम्या आणखी आहेत...