आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Police Officer Fall During Parade In Maharashtra

सीएम फडणवीस यांना सलामी दिल्यानंतर बेशुद्ध झाली महिला पोलिस अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचा 111 दीक्षांत समारोह साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 543 पोलिस उपनिरीक्षकांना सन्मानित केले. समारंभापूर्वी नव्या उपनिरिक्षकांनी मुख्यमंत्र्यांनी सलामी दिली. त्या परेडमध्ये एक महिला उपनिरीक्षक बेशुद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फोटो - परडेदरम्यान महिला उपनिरिक्षक बेशुद्ध झाल्या त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना सावरले.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात पोलिस दल अधिक प्रभावी व्हावे यासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पोलिस विभागासाठी इ- प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सायबर क्राइमला आळा घालण्याबरोबरच इतर नोंदी ठेवण्यासही मदत होणार आहे.

शिक्षक बनला उपनिरीक्षक
निफाडमध्ये जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या यशवंत विश्वनाथ बोरसे यांना सर्वोत्कृष्ट पोलिस उपनिरीक्षक म्हणून गौरवण्यात आळे. घरची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही यशवंत यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि जिल्हा परिषदेत शिक्षकाची नोकरी मिळवली. मात्र पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते त्यामुळे त्यांनी परीक्षा दिली आणि पोलिस अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली.
पुढील स्लाइडवर पाहा, सोहळ्याचे PHOTOS