आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकानांविराेधात महिलांचा एल्गार; प्रशासनाचा मात्र विक्रेत्यांनाच अाधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार महामार्गावरील बंद झालेले बिअर बार, वाइन शॉप देशी दारूची दुकाने आता शहराच्या विविध भागांत सुरू हाेण्याचा धाेका वाढला अाहे. हा धोका परतवून लावण्यासाठी शहरातील महिलांसह विविध सामाजिक संस्था एकवटल्याने प्रशासनावर धाक निर्माण झाला अाहे.
 
मात्र, मुळात नवीन दुकानांना परवानगी देतानाच त्या भागातील लाेकांची मते जाणून घेतल्यास अथवा दारू दुकानास परवानगी देण्याबाबत जाहीर प्रसिद्धी केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेणार नाही. परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लाेकांची मते जाणून घेण्याएेवजी थेट दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने शहराच्या विविध भागांत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. महिलांच्या भावनाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर डी. बी. स्टारचा हा प्रकाशझाेत...
 
न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने, बिअर बार बंद करण्यात अाले अाहे. ही दुकाने अाता ग्रामीण शहरी भागात स्थलांतरित करण्याचे प्रयत्न व्यावसायिकांकडून केले जात अाहे. हा धाेका अाेळखूनच विविध भागांतील महिलांनी एकत्र येऊन दारू दुकानांना विराेध केला अाहे. सातपूरपासून दारू दुकानाविरुद्धचे अांदाेलन पेटले हाेते. तेव्हापासून शहराच्या सर्वच भागांमध्ये महिलांनी एकत्रितपणे लढा देण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. महालक्ष्मीनगर सिडकाे, शुभम पार्क परिसर सिडकाे, लंबाेदर अपार्टमेंट तिडके काॅलनी, ड्रीम कॅसल जुना मखमलाबाद नाका, मेरी-म्हसरूळ लिंकराेड, पंचवटी, नाशिकराेड अशा सर्वच भागांमध्ये दारूची दुकाने थाटण्याचा घाट घातला जात अाहे या सर्वच भागांतील महिलांनी काेणत्याही प्रकारे दुकाने सुरू हाेऊ नयेत यासाठी ‘कराे या मराे’ची भूमिका घेत कडवा विराेेध केला अाहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अाहे.
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांची मते जाणून घेताच सर्रास रहिवासी भागात दारू दुकानांना परवानगी दिली जात अाहे. एकदा दुकानास परवानगी देण्यात अाली की ते दुकान कायदेशीररित्या बंद करण्यासाठी माेठ्या प्रमाणात अडचणी येतात. यासाठी मतदान घेणे हाच एक प्रभावी उपाय अाहे. त्यामुळे दुकानदार अतिशय बेमालूमपणे परवानगी घेऊन येतात अाणि स्थानिक नागरिकांचा विराेध डावलून दुकाने थाटतात. काही ठिकाणी तर बळाचा वापर करण्याचादेखील प्रयत्न करण्यात अाला. मात्र, महिलांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. महिलांचा विराेध असलेल्या भागात दुकाने सुरू हाेऊ देऊ नये अशी मागणी महिलांच्या शिष्टमंडळाने विभागीय अायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली अाहे. अशाचप्रकारे जिल्हाधिकाऱ्यांचीही महिलांनी भेट घेतली, मात्र शासकीय परवानगीचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हतबलता दर्शविल्याची माहिती महिलांनी दिली.
 
मतदान हा एकमेव पर्याय
शासनाच्या नियमाप्रमाणे दुकानदारांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाते. परवाना दिलेले दुकान बंद करण्यासाठी मतदान हा एकमेव पर्याय अाहे. रहिवाशांचा जर दारू दुकानास विराेध असेल तर त्यांच्या तक्रारीवरून त्या भागात मतदान घेतले जाते. त्यात जर ५० टक्के महिलांनी दारू दुकानाच्या विराेधात मतदान केल्यास परवानगी रद्द हाेते.
- सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
 
 
दारूबंदीसाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती हवी
दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर उतरत अाहेत. मात्र, अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर दारूबंदीही शक्य अाहे. परंतु, दुर्दैवाने तसे हाेत नाही. सरकारने अाता लक्षात घ्यावे की जनताच कायदा हातात घेत अाहे. त्यामुळे सरकारनेच अाता दारूबंदीसाठी पावले उचलावीत.
- ज्याेती वाकचाैरे, सामाजिक कार्यकर्त्या
 
मग हा दारू दुकान मार्ग हाेईल...
न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक दुकाने मध्यवस्तीत येत अाहेत. अशी दुकाने मध्यवस्तीत अाली तर नागरिकांना अडचणीचे हाेते. अामच्या भागात तीन-तीन दुकाने अाहेत. त्याच्यामुळे खूपच त्रास वाढला अाहे. नागरिक तक्रारी करत अाहेत. या रस्त्यावर मद्य घेणाऱ्यांची गर्दी हाेऊ लागली अाहे. त्यामुळे काही दिवसांनी या रस्त्याचे श्री श्री रविशंकर मार्गाएेवजी दारू दुकाने मार्ग असे नामकरण हाेते की काय याची भीती वाटते.
- सुषमा पगारे, नगरसेविका

साधू-महंतही उतरले रस्त्यावर
दारूचीदुकाने बंद करावीत यासाठी साधू-महंतदेखील रस्त्यावर उतरले अाहे. पेगलवाडी (त्र्यंबकेश्वर) येथील महंत बिंदू महाराज महंत सागरानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली साधु-संतांनीही अांदाेलन करून दारू दुकाने बंद करावी, अशी मागणी पाेलिस अायुक्त डाॅ.रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली अाहे. विशेष म्हणजे हे अांदाेलन फेसबुकवरही लाइव्ह करण्यात अाले हाेते.
 
प्रशासनास विचार करावा लागेल
महिलांनी उभी बाटली आडवी करण्यासाठी पुढाकार घेतला अाहे. लाेकशाही मार्गाने त्यांनी सुरू केलेल्या अांदाेलनात कायम सातत्य ठेवल्यास माेठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. प्रत्येक भागातील महिलांचा रुद्रावतार प्रखर अांदाेलन बघता प्रशासनाला नाइलाजास्तव अापला निर्णय बदलावा लागेल, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली.
 
मतदानानेच हाेते दुकान बंद
दारूदुकान बंद करण्यासाठी मतदान हा एकमेव पर्याय अाहे. ५० टक्के महिलांच्या मतदानाने केवळ एकच दुकान किंवा शॉपी बंद करता येत नाही. शहरात वाॅर्ड अथवा प्रभाग आणि ग्रामीण भागात गावात दारूबंदी करायची असल्यास महिला मतदारांपैकी २५ टक्के महिलांनी उत्पादन शुल्क विभागाकडे मागणी करणे बंधनकारक आहे. महिला मतदारांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी आडव्या बाटलीला मतदान केल्यास गावात किंवा वॉर्डात दारूबंदी होते.
 
येथे एल्गार
अशाेकामार्ग परिसरातील श्री श्री रविशंकर मार्गावरील टागोरनगर या रहिवासी भागात सुरू झालेल्या दारू दुकानाला परिसरातील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. हे दुकान बंद व्हावे यासाठी संतप्त महिलांनी दुकानासमोर गणपतीची स्थापना केली अाहेे. गणपतीची आरती करत दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी गणरायाला साकडे घालण्यात आले.
 
या भागांत महिला उतरल्या रस्त्यावर
- दिंडोरी रोडवरील अमित वाइन या बंद झालेल्या दारूविक्रीच्या दुकानाचे शटर पुन्हा उघडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या दुकानास नागरिकांचा विरोध लक्षात घेता विक्रेत्यांकडून काही काळ दुकान बंद केले जाते. विरोध मावळल्यानंतर पुन्हा दुकान सुरू केले जात असल्याने महिलांनी रुद्रावतार घेत दुकानासमोर आंदोलन करत दुकान बंद केले. या आंदोलनात परिसरातील दीडशे महिला सहभागी झाल्या होत्या.
- नवीन तिडके कॉलनीतील रहिवासी इमारतीत वाइन शॉप सुरू करण्यासाठी थेट दोन ट्रक भरून देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या अाणल्या हाेत्या. मात्र, परिसरातील जागरूक महिलांसह नागरिकांनी या शाॅपला विरोध दर्शवत थेट रस्त्यावर मद्याच्या बाटल्या फेकल्या. महिलांचा रुद्रावतार बघत शेवटी वाइन शॉपचालकास आणलेला माल परत नेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. त्यानंतर त्याने हा माल परत नेला.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेठरोड परिसरातील बंद झालेले हिरा वाइन्स हे दुकान नवीन तिडके कॉलनीतील लंबोदर अॅव्हेन्यू या इमारतीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गाळ्यामध्ये सुरू करण्यात येणार होते.