आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटीतील हनुमाननगर येथे महिलेची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - पंचवटीतील हनुमाननगर परिसरात मंगळवारी दुपारी घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन एका विवाहितेने आत्महत्या केली. महिलेची आई घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तृप्ती रमणलाल छाजेड (वय 21) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी तृप्तीचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती आईकडेच राहत होती. दुपारी आई घरात नसताना तिने जीवन संपविले. ‘माझ्या मरणास कोणीही जबाबदार नाही’, अशी चिठ्ठी तृप्तीने लिहून ठेवली होती. आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एएसआय उत्तम शिंदे, एस. बी. मगर तपास करीत आहेत. पंचवटी परिसरातील एका महिलेने दोनच दिवसांपूर्वी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ ही घटना घडली.