आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी सरसावल्या रणरागिणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-प्रभाग क्रमांक १७मधील श्रमिकनगर, शिवाजीनगर ध्रुवनगर या परिसरातील देशी-विदेशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी शनिवारी (दि. ११) महिलांच्या सह्यांची पडताळणी करण्यात अाली. स्वाक्षरी पडताळणीसाठी महिला माेठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने दारू दुकाने बंद करण्यावर जणू शिक्कामाेर्तबच झाले अाहे.

ही दुकाने बंद करण्यासाठी नगरसेवक दिनकर पाटील नगरसेविका लता पाटील यांनी पुढाकार घेतला अाहे. पालिका निवडणुकीदरम्यान पाटील दांपत्याकडे अनेक महिलांनी ही दुकाने बंद करण्याची मागणी केली हाेती. तेव्हापासून पाठपुरावा केल्याने दुकाने बंद करण्यासाठी दुसऱ्यांदा स्वाक्षरी पडताळणी करण्यात येत अाहे. शनिवारी सकाळी १० वाजता स्वाक्षरी पडताळणीला सुरुवात हाेताच महिला माेठ्या संख्येने घराबाहेर पडू लागल्या. काही महिलांची नवराेबांनीच अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा विराेध डावलून त्यांनी पडताळणीसाठी हजेरी लावली.

अाजही हाेणार पडताळणी
दारूचीदुकाने बंद करण्यासाठी सुमारे २,९२२ महिलांच्या स्वाक्षरींचे नव्याने निवेदन देण्यात अाले हाेते. या निवेदनातील स्वाक्षऱ्यांची शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी पडताळणी करण्यात येणार अाहे. रविवारी (दि. १२) सकाळीही १० ते या वेळेत इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयात पडताळणी करण्यात येणार अाहे.
पाटील दांपत्य तळ ठाेकून
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या पॅनलची निर्मिती करण्यात पुढाकार घेणाऱ्या दिनकर पाटील यांनी शनिवारी मात्र प्रभागातील या महत्त्वाच्या प्रक्रियेकडे लक्ष देत पडताळणी केंद्रावर सपत्नीक तळ ठाेकला हाेता.

असा हाेता पोिलस बंदाेबस्त
पडताळणीसाठीशाळेच्या अावारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अाले हाेते. तसेच बूथ, तक्रार निवारण केंद्रही उभारण्यात अाले हाेते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र अावळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार उत्पादन शुल्क निरीक्षक, अाठ उपनिरीक्षक २८ कर्मचारी, तसेच गंगापूर पाेलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे असा सुमारे ५० अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता.