आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहेडचे काळ्याबाजारात जाणारे रेशनचे धान्य महिलांनी पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळगाव बसवंत- येथून जवळ असलेल्या बेहेड गावातील महिलांनी रेशन दुकानातून काळ्या बाजारात धान्य घेउन जाणारा टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. 

शेकडो आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. १९) बैठक घेऊन सप्तशंृगी महिला बचतगटाकडे दहा वर्षांपासून असलेले रेशन दुकान सोसायटीकडे वर्ग करावे यासाठी ठराव सर्वानुमते मांडला. यानंतर रेशन दुकानाला कुलूप लावले होते. याच दिवशी दुकानचालक कमलबाई बैरागी यांनी रात्री रेशन दुकानातील काही धान्य मारुती व्हॅनमध्ये लंपास केले. यानंतर रविवारी बैरागी रेशन दुकानाला कुलूप लावल्याबद्दल स्थानिक महिलांच्या ग्रामपंचायत सदस्य अशोक घुटे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पिंपळगाव पोलिस ठाण्यात पोहाेचल्या. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. 

बैरागी यांनी रविवारी रात्री ११ वाजता एका मारुती अल्टो कारमध्ये रेशनचे धान्य भरले ते काळ्याबाजारात लंपास करीत असताना शेकडो आदिवासी महिलांनी सदर गाडी अडवली. गाडीचालक महिलांना बघून फरार झाला. यावेळी महिलांनी गाडीच्या काचा फोडून राग व्यक्त केला. यावेळी पिंपळगाव बसवंत पोलिसांना वेळीच पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी ही गाडी पोलिस ठाण्यात जमा केली. पुरवठा अधिकारी ए. एम. शेख यांनी रेशन दुकानातील सर्व दप्तराची तपासणी करून ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...