आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीची तक्रार केल्याचा राग आल्याने महिलेला मारहाण अन् मुलीचा विनयभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - छेडछाड केल्याची तक्रार केल्याचा राग आल्याने संशयितांनी पीडित मुलीस तिच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २६) या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात इंदिरा गांधी वसाहत, शिवाजी चौक, सिडको येथे सोमवारी प्रकार घडल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरा गांधी वसाहत येथे राहणाऱ्या मुलीची परिसरातील एका मुलाने छेड काढली होती. हा प्रकार पीडित मुलीने घरी सांगितला. घरच्यांनी याचा संबंधितांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने संशयित धनाजी गायकवाड, तानाजी गायकवाड, अनिल काळे, विठ्ठल दांडेकर, गणपत गायकवाड यांनी पीडित मुलीच्या घरात घुसून तलवार सळीने चुलती आणि आई-वडिलांना बेदम मारहाण केली. पीडित मुलीस पकडून ‘हिचे लग्न तानाजीशी लावून दिले नाही तर जिवे मारू’ अशी धमकी दिली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची सावकाराकडून फसवणूक
व्याजानेघेतलेली रक्कम परत करूनही गहाण ठेवलेल्या घरावर कर्ज काढून ते पैसे हडप केल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. दामू भिकाजी गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राहुरीच्या सावकाराकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले. दरमहा १० हजार हप्ता देऊन सर्व कर्ज फेडले.

मात्र संशयिताने मुलाला विश्वासात घेऊन बँक कर्ज काढण्यास सांगितले. १३ लाख ५० हजार कर्ज काढून ते देखील खात्यावर वर्ग केले. या विरोधात तक्रारीनंतर सहकार खात्याने चौकशी केली, मात्र काही तथ्य अाढळले नसल्याचा शेरा देण्यात आला.