आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या सुटकेसाठी शरीरसुखाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक देवाण-घेवाणीच्या एका प्रकरणात पतीला बेदम मारहाण करून त्याच्या सुटकेसाठी त्याच्यासमाेरच पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत पतीला सोडवण्याचा प्रकार सातपूर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दाेन संशयितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांनी त्या पीडित महिलेचीच उलट तपासणी केल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या पतीची सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपनी आहे. संशयित मोहन पाटील, त्याचा मित्र दोंदे (पूर्ण नाव नाही) यांच्याकडून पतीने काही रक्कम घेतली होती. यातील काही परत दिली. मात्र, उर्वरित रकमेसाठी संशयितांनी तगादा लावला होता. पतीला सातपूरच्या एका हॉटेलमध्ये नेत बेदम मारहाण करत त्यांनी पैशांची मागणी केली. पतीला सोडवण्यास पीडिता गेली असता, संशयितांनी तिचा हात पकडून ‘पतीला सोडतो, जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत तू आमच्या सोबत राहा’ असे म्हणत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत केली आहे. संशयित फरार असून, पाेलिस त्यांचा शाेध घेत अाहेत.

घटना गंभीर आहे
^पीडितेच्या तक्रारी नुसारगुन्हा दाखल केला अाहे. घडलेला प्रकार गंभीर आहे. संशयितांवर कडक कारवाई केली जाईल. -श्रीकांत धिवरे, उपआयुक्त, परिमंडळ
बातम्या आणखी आहेत...